महाराष्ट्रातील 400 वर्ष जुनी परंपरा! 70 क्विंटल वांग्याच्या भाजी, हजारो भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ

निवडणुकीच्या धामधुमीत ही गावकऱ्यांनी चारशे वर्ष जुनी परंपरा पाळली आहे. आहेरवाडीत 70 क्विंटल वांग्याच्या भाजीचा प्रसाद  तयार करण्यात आला.  हजारो भाविकांनी  प्रसादाचा लाभ घेतला. 

Updated: Apr 21, 2024, 08:29 PM IST
महाराष्ट्रातील 400 वर्ष जुनी परंपरा!  70 क्विंटल वांग्याच्या भाजी, हजारो भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ title=

Parbhani Yatra : महाराष्ट्र हे पंरपरा आणि संस्कृती जपणारे राज्य आहे. महाष्ट्रातील परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आहेरवाडीच्या यात्रा देखील अनोखी आहे. महाराष्ट्रातील या यात्रेत 400 वर्ष जुनी परंपरा जपली जाते. या यात्रेनिमित्ताने  70 क्विंटल वांग्याच्या भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला.  हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. 

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे श्री सजगीर, श्री हिरागीर आणि गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त ७० क्विंटल वांग्याच्या भाजीचा प्रसाद तयार करण्यात आलाय, ही चारशे वर्ष जुनी परंपरा आज ही कायम आहे. या गावात श्री सजगीर महाराज, श्री हिरागीर महाराज व श्री गुरुवर्य रामगिरी महाराज यांची समाधी आहे. या गावाच्या हाकेच्या अंतरावर थुना नदी आहे. नदीच्या तीरावर महाराजांची समाधी मंदिरे आहेत. विशेष या गावाला गेल्या चारशे वर्षापासून वांग्याच्या भाजीचा प्रसादभाविकांना दिला जातो आणि या भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी भाविक दुरून दुरून येत असतात. निवडणुकीच्या धमधुमित ही गावकर्यांनी चारशे वर्ष जुना हा उत्सव कायम ठेवलाय, हजारो भाविकांनी या भाजीच्या प्रसाद घेतला.

काटेरी निवडुंगाने पाठीवर मारण्याची प्रथा 

पेण तालुक्यातील वढाव येथील श्री बहिरी देवाची जत्रा आज मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. दुपारी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या वेळी भक्तमंडळी उघड्या पाठीवर काटेरी निवडुंग मारून घेतात. ही प्रथा ग्रामस्थानी आजही जपली असून ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आजच्या उत्सवाला कामानिमित्त बाहेर स्थायिक झालेल्या चाकरमान्यानी गावात हजेरी लावली.

भगवान महावीर जयंतीनिमित्त सोलापुरात जैन बांधवांकडून शोभायात्रा

भगवान महावीर जयंतीनिमित्त सोलापुरात जैन बांधवांकडून शोभायात्रा काढण्यात आली...यावेळी रंगभवनमध्ये ध्वजारोहण करून तैलचित्र रथातून भव्य मिरवणूक काढली. भाजप उमेदवार राम सातपुते यांनी सहभाग घेतला...यावेळी जैनबांधवांनी पारंपरिक वेशाभूषा केली होती...ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली.

साता-यातील श्री क्षेत्र निनाम इथल्या मानाच्या सासनकाठीचं वाडी रत्नागिरीकडे प्रस्थान

साता-यातील श्री क्षेत्र निनाम इथल्या मानाच्या सासनकाठीचं वाडी रत्नागिरीकडे प्रस्थान झालंय. वाडी रत्नागिरी चैत्र यात्रा 23 एप्रिलला होणारेय. या यात्रेत सहभागी होण्यासाठी अनेक मानाच्या सासनकाठ्या येत असतात. यात निनामच्या सासनकाठीलाही यात्रेत महत्त्वाचं स्थान आहे.  वर्षानुवर्ष गावकरी पायी चालत सासनकाठी घेऊन वाडी रत्नागिरीकडे जातात.