औरंगाबादमध्ये ५० लाखांचं अवैध सॅनिटायझर जप्त

 कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सॅनिटायझर, मास्कच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ

Updated: Mar 16, 2020, 08:36 AM IST
औरंगाबादमध्ये ५० लाखांचं अवैध सॅनिटायझर जप्त title=

औरंगाबाद : कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. सर्वच देश याच्याशी लढण्यासाठी योजना आखत आहेत. असे असताना संधीचा फायदा घेऊन काही बोगस वृत्ती समाजात आपले हातपाय पसरत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सॅनिटायझर, मास्कच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ही मागणी पुरवण्यासाठी अनेकांनी बोगस कंपन्या उघटल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभुमीवर कारवाई करत औरंगाबादमध्ये ५० लाखांचं अवैध सॅनिटायझर जप्त करण्यात आलंय.

फसवणुकीचा प्रकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रसासनानं ही कारवाई केलीये.. वाळूज इथल्या युरोलाईफ हेल्थ केअर या कंपनीत सॅनिटायझरची एक्सपायरी डेट आणि किंमतीमध्ये बदल करुन फसवणुकीचा प्रकार सुरु होता. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागानं वेळीच कारवाई करुन ५०लाखांचं सॅनिटायझर जप्त केलं..

संशयिताचा मृत्यू 

कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू झाला आहे. संबधित व्यक्ती 15 तारखेला कोरोना संशयित म्हणून सीपीआरमध्ये झाली होती. संशयित मृत व्यक्तीने 8 मार्च ते 15 मार्च दरम्यान हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे, आणि कोल्हापूर असा टॅक्सीने प्रवास केला होता. मृत व्यक्ती मूळची हरियाणामधील राहणारी होती. पण कामानिमित्त हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं वास्तव्यास होती.

रुग्णांची संख्या ३३ वर 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३३ वर गेली आहे. केईएममध्ये बुधवारपासून नवी मशिन आणि सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे तिथे देखील रुगण चाचणीची क्षमता वाढणार आहे. १५ ते २० दिवसांच्या आत नवी लॅब सुविधा, प्रशिक्षण पुरवण्यात येणार आहे. महिन्याभरात मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबाद इथे लॅब उभारण्यात येणार आहेत. सेव्हन हिल्समध्ये ४०० बेड्स तयार करण्यात आले आहेत. एमपीएससी परीक्षा ३० मार्चनंतर घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

पंतप्रधनांची घोषणा 

सार्क देशांमध्ये यासंदर्भातीस १५०० प्रकरणे समोर आली आहेत. एकमेकांच्या सहाय्याने याच्याशी लढण्यास सोपे जाईल असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले. कोरोनाशी लढण्यासाठी सार्क देशांतकडून निधी उभारला जाईल. या निधीमध्ये १ कोटी डॉलर इतका निधी भारतातर्फे दिला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. यातून उपकरणे खरेदी केली जातील असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.