अवैधरित्या गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला अटक

सांगली जिल्ह्यातील मालगावमधील गांजाच्या शेतीवर मिरज ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. 

Updated: Oct 26, 2017, 12:25 PM IST
अवैधरित्या गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला अटक  title=

सांगली : सांगली जिल्ह्यातील मालगावमधील गांजाच्या शेतीवर मिरज ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. 

या छापेमारीत 2 लाख 50 हजार रुपयांची 56 गांजाची झाडं जप्त केलीत. या गांजाच्या झाड़ाचं वजन हे 82 किलो इतकं आहे. 

उसाच्या शेतीमध्ये आंतरपिक म्हणून अवैधरित्या मनोहर गावडे हा शेतकरी गांजाची शेती करत होता. याप्रकरणी गांजाची शेती करणा-या मनोहर गावडे या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. पोलीस या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.