IFFI 2020 : गोव्यात आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवाला सुरुवात

 भारतीय आंतरराष्ट्रीय सिने महोत्सव (IFFI 2020) ला सुरुवात 

Updated: Jan 19, 2021, 06:33 PM IST
IFFI 2020 : गोव्यात आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवाला सुरुवात title=

नवी दिल्ली : गोव्यात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय सिने महोत्सव (IFFI 2020) ला सुरुवात झालीय. 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवाचे आयोजन यावेळी गोव्याच्या पणजीतील डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये करण्यात आलंय. १६ जानेवारीपासून या महोत्सवाला सुरुवात झाली असून २४ जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरु राहील. 

यावेळी जगातील 224 सिनेमा या महोत्सवात दाखवले जात आहेत. भारतीय आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवात सहभागी होण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर गोव्यात पोहोचलेयत. कला आणि संस्कृतीच्या दृष्टीने हे आयोजन महत्वाचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. याआधी पेक्षा यंदाचे आयोजन विशेष 

51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवात यावेळेस 'कंट्री इन फोकस' म्हणून बांगलादेशची निवड झालीय. हा आतंरराष्ट्रीय महोत्सव आशियातील सर्वात खास महोत्सवांपैकी एक आहे. याची सुरुवात 1992 साली करण्यात आली. दरवर्षी गोव्यात हा महोत्सव होतो. सर्वांना समान मंच उपलब्ध करुन देणं हा या महोत्सवामागचा उद्देश आहे.