IAS Pooja Khedkar: स्थानिक शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन धमकावल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा साध घेत आहेत. पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह त्यांचे पती आणि बाऊन्सर्स यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण पोलिसांचा कुटुंबाशी संपर्क होत नाही आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) कुटुंबातील सात जणांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली आहेत. दरम्यान यावर पूजा खेडकर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
IAS पूजा खेडकरांचं कुटुंब फरार? पुणे पोलिसांकडून शोध सुरु, गुन्हे शाखेच्या तीन पथकांकडून सर्च ऑपरेशन
पूजा खेडकर यांना आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल असून, ते फरार आहेत यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारलं असता म्हणाल्या की, "मी यावर कोणतंही भाष्य करु शकत नाही हे आधीच सांगितलं आहे. प्रशासकीय नियम मला काहीही बोलण्याची परवानगी देत नाहीत. मी मीडियाशी कोणतीही गोष्ट शेअर करु शकत नाही. जे काही असेल ते मी समितीसमोर सांगेन".
#WATCH | Maharashtra: On FIR filed against her parents for allegedly threatening a local farmer, trainee IAS officer Pooja Khedkar says, "I have said earlier also that I cannot comment on this. Rules do not allow me to say anything. I cannot share anything with the media,… pic.twitter.com/LWhvta3vA7
— ANI (@ANI) July 15, 2024
पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय. या सर्वांचे मोबाईल फोनही स्वीच ऑफ असल्याचं पोलीसांचं म्हणणं आहे. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचं गेट बंद असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचं चित्रीकरण केलं.
दरम्यान पूजा खेडकर यांचा अकोल्यातील प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलण्यात आला आहे. पूजा खेडकर या अकोल्यातील आदिवासी विकास प्रकल्प येथे प्रशिक्षणार्थी म्हणून 15 ते 19 जुलै पर्यंत रुजू होणार होत्या. तसंच पूजा खेडकर प्रकरणी पीएमओ कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे...पूजा खेडकरांचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता आहे. यासोबतच पूजा खेडकरांना दिव्यांग प्रमाणपत्र देणा-या डॉक्टरांचीही चौकशी होणार आहे. .