पूजा खेडकर नॉट रिचेबल! वाशिमहून पुण्याला जाताना अचानक गायब, नेमकं काय झालं?

Pooja Khedkar Not Reachable: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) नॉट रिचेबल झाल्या आहेत. वाशिमहून पुण्याच्या (Pune) दिशेने निघालेल्या पूजा खेडकर मध्येच गायब झाल्या. मसुरीच्या लालबहादूर शास्त्री अकादमीतही (Lal Bahadur Shastri Academy) त्या हजर झालेल्या नाहीत.   

शिवराज यादव | Updated: Jul 23, 2024, 05:39 PM IST
पूजा खेडकर नॉट रिचेबल! वाशिमहून पुण्याला जाताना अचानक गायब, नेमकं काय झालं? title=

Pooja Khedkar Not Reachable: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) नॉट रिचेबल झाल्या आहेत. वाशिमहून पुण्याच्या (Pune) दिशेने निघालेल्या पूजा खेडकर मध्येच गायब झाल्या. मसुरीच्या लालबहादूर शास्त्री अकादमीतही (Lal Bahadur Shastri Academy) त्या हजर झालेल्या नाहीत. पूजा खेडकर यांचा फोनही लागत नसल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळवणुकीची तक्रार दाखल केली होती. यानंतर 20 जुलैला जबाब नोंदवण्यासाठी त्या पुण्यात येणार होत्या. मात्र त्याआधीच यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे वाशिमहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या पूजा खेडकर मध्येच गायब झाल्या. 

पूजा खेडकर यांना 23 जुलैपर्यंत मसूरीच्या लालबहादूर शास्त्री अकादमीमध्ये हजर होण्यास देखील सांगण्यात आलं होतं. मात्र त्या अजूनपर्यंत तिथं पोहोचलेल्या नाहीत. पूजा खेडकर यांचा फोनही लागत नसल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित 

पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्यात आलं आहे. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली आहे. 23 जुलैपूर्वी मसूरी इथल्या अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे पूजा खेडकर यांना आदेश देण्यात आले होते. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरण यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. पूजा खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व (Physical Disability) आणि ओबीसी प्रमाणपत्रही (OBC Certificate) बनावट असल्याचं समोर आलं होतं. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी इथल्या लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे. 

खासगी ऑडीवर लाल दिवा, महाराष्ट्र शासनची पाटी यामुळे ट्रेनी आयएएस पूजा खेडकर वादात सापडल्या. यानंतर त्यांचे व्हॉट्सअॅप चॅटही व्हायरल झाले. त्यांनी खोटे नॉन क्रिमिएल प्रमाणपत्र जोडल्याची माहिती समोर आली. यामुळे दिवसेंदिवस त्यांचा पाय आणखीनच खोलात गेला. यातच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा पोलीस, शेतकऱ्यांवर दादागिरी करतानाचे व्हिडिओ समोर आले.

आयएएस पदापर्यंत पोहोचण्यासाठी पूजा खेडकर यांनी चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. चुकीच्या कागदपत्रांच्या माध्यमातून पूजा यांची निवड झाली का? असा प्रश्न उपस्थित होतोय.या पार्श्वभूमवर पंतप्रधान कार्यालयातून यासंदर्भातील माहिती मागवण्यात आली आहे.