पुणेः पत्नीने जेवणात चिकन बनवलं नाही; नवऱ्याने चिमुकल्या लेकीला दिली भयंकर शिक्षा

Pune News Today: पत्नीने जेवणात चिकन न दिल्यामुळे चिडून पतीने लहान मुलीच्या डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 1, 2023, 02:03 PM IST
पुणेः पत्नीने जेवणात चिकन बनवलं नाही; नवऱ्याने चिमुकल्या लेकीला दिली भयंकर शिक्षा title=
Husband Threw Brick On Little Girl Head over wife didnt feed him chicken in dinner

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणात पत्नीने चिकन बनवून न दिल्यामुळं पतीने याची शिक्षा चिमुकल्या मुलीला दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने मुलीच्या आईला एकच धक्का बसला आहे. मुलीची अवस्था पाहून तिने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पाषाण येथील वाकेश्वर रस्ता परिसरातील पूनम बेकरीजवळ घडली आहे. (Pune News Today) 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवणात चिकन न दिल्यामुळं चिडलेल्या वडिलांनी लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली. वडिलांनी केलेल्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.  या प्रकरणी महिलेचे वडील रघुनाथ लाला पवार पंचवटी, पाषाण) यांन चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

चमुकलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विकास नागनाथ राठोड (रा. वाकेश्वर रस्ता, पाषाण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. सोमवारी विकास राठोड घरी आला असता त्याला पत्नीने जेवण वाढले. मात्र जेवणात चिकन नसल्याने त्याने पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये यावरुन जोरदार भांडणं झाले. 

पत्नीने चिकन न दिल्याच्या रागातून विकासने तिथेच खेळत असलेल्या लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली आणि तिला जखमी केली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाहीये. 

रायगडमध्ये महिलेची मुलीसह आत्महत्या

रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोकण रेल्वेखाली उडी मारून एका महिलेने तिच्या दोन मुलींसह आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील घटना आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.