मुंबई: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही ठिकाणी 36 तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा कहर कायम राहिला तर दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कशा होणार या प्रश्न समोर आहे.
10 वी-12 वीच्या परीक्षा घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. याबाबत पुढच्या आठवड्यात महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. कोरोनाचा कहर पाहता परीक्षांबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात का? याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
दुसरीकडे वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संध्याकाळी सहा नंतर नाईट कर्फ्युचा विचार सुरू आहे. त्या जिल्ह्यातील परिस्थिती नुसार जिल्ह्याधिकारी त्याबाबत निर्णय घेतील. त्यानंतरही सुरक्षिच्या दृष्टीने लोकांनी काळजी घेतली नाही तर लॉकडॉनची पाळी येऊ शकते त्यामुळे लॉकडाऊन करावं लागू शकतं अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमिवर 1305 इमारती सील. 2749 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या इमारतीत एकूण 71, 838 रहिवासी आहेत.