बारावीच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षा देण्यापुर्वी 'या' गोष्टी अजिबात विसरु नका!

HSC Exam: . दरम्यान उद्या परीक्षा केंद्रावर जाण्यापुर्वी विद्यार्थ्यांना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 20, 2024, 02:56 PM IST
बारावीच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षा देण्यापुर्वी 'या' गोष्टी अजिबात विसरु नका!  title=
HSC Exam

HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा उद्यापासून म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची सर्व विषयाचा अभ्यास एव्हाना झाला असेल. वर्षभर केलेला अभ्यास योग्यपण उत्तरपत्रिकेवर उतरवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.  यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 15 लाख13 हजार 909 विद्यार्थ्यांनी (Students) नोंदणी केलेली आहे. यामध्ये 8 लाख 21 हजार 450 विद्यार्थी आणि 6 लाख 92 हजार 424 विद्यार्थीनी आहेत. एकूण 100497 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3320 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान उद्या परीक्षा केंद्रावर जाण्यापुर्वी विद्यार्थ्यांना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. 

परीक्षेला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?

ऐनवेळी नवीन अभ्यासण्याचा प्रयत्न करु नका. वर्षभर जो अभ्यास केलाय त्याची उजळणी करा.

मन शांत ठेवा. जास्त ताण घेऊ नका. तुम्ही देत असलेली परीक्षा वर्षभर केलेल्या अभ्यासाचे फलित असेल. 

परीक्षा केंद्रावर कोणी मदत करेल, पर्यवेक्षक आपल्या दृष्टीने चांगला असेल,अशा भ्रामक कल्पनेत राहू नका. स्वत:च्या अभ्यासावर विश्वास ठेवा. 

कॉपी करण्याचा अजिबात प्रयत्न करु नका. छोटीशी चूक तुमच्या करिअरवर परिणाम करु शकते. 

बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी पोहोचा.

परीक्षेला जाण्यापुर्वी हॉलतिकीट आणि ओळखपत्र घेतले आहे की नाही? हे तपासा. 

परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल. नसेल तर तुम्हाला परीक्षेसाठी अडचण येऊ शकते. 

विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये मोबाईल, ब्लूटूथ, इयर फोन असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेऊ नका.

प्रश्नपत्रिका सोडवताना प्रत्येक प्रश्नांना किती वेळ लागतो हे लक्षात ठेवा. त्यानुसार संपूर्ण पेपर आणि वेळेचे नियोजन करा. 

उत्तरपत्रिका लिहायला घेण्याआधी बैठक क्रमांक, परीक्षा केंद्र क्रमांक सर्व बरोबर टाका. पेपर देण्यापुर्वी तपासून पाहाय

प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नव्या पानावर करा..खाडाखोड करणे टाळा. 

प्रश्न बारकाईने आणि दोनवेळा वाचा. आपण अभ्यास केलेला प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. 

निकाल काय लागेल, हे तुमच्या हातात नाही. पण परीक्षा चांगली देणे हे नक्कीच आहे.

परीक्षेवेळी कोणताही त्रास जाणवत असेल तर परीक्षा केंद्रावरील शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्या. 

बारावीची परीक्षा आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही. त्यामुळे मानसिक ताण घेणे टाळा आणि शांत, एकाग्र मनाने परीक्षा द्या.