HSC Exam 2023 : 12वी पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई, 4 परीक्षा केंद्राच्या संचालकांची तात्काळ उचलबांगडी

HSC Exam Paper Leak : 12वीची परीक्षा सुरु आहे. मात्र, परीक्षेत मोठा घोळ सुरु असल्याने पालकांसह विद्यार्थी गोंधळून गेले आहत. त्यातच पेपरफुटीमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोल सुरु असल्याची बाब पुढे आली आहे. राज्यात काही ठिकाणी पेपर लिक होण्याचा घटनेमुळे शिक्षण विभागाच्या गलथान कारभार पुढे आला आहे. दरम्यान, बुलडाणा येथे गणित विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला. या प्रकरणी  'झी 24 तास'ने वृत्त समोर आणले. यानंतर आता कारवाईला वेग आलाय. गणित पेपरफुटीप्रकणी  परीक्षा केंद्राच्या संचालकांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे.

Updated: Mar 4, 2023, 11:21 AM IST
HSC Exam 2023 : 12वी पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई, 4 परीक्षा केंद्राच्या संचालकांची तात्काळ उचलबांगडी  title=

HSC Exam 2023 Paper Leak : बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये काल सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत होता. (HSC Exam) 12 वीचा हा फुटलेला पेपर 'झी 24 तास'च्या हाती लागला आहे. हा गणिताचा पेपर कुणी फोडला? पेपर व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे? याचा शोध घेण्यात येत आहे. (HSC Exam News) दरम्यान, पेपरफुटीकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. (Buldhana HSC Paper Leak Case)  'झी 24 तास'च्या बातमीनंतर शिक्षण विभाग खडबडून जागे झाले आहे. गणित विषयाच्या पेपरफुटीप्रकरणी कारवाई करताना चार परीक्षा केंद्राचे संचालक बदलले. कालच बुलढाण्यातील सिंदखेडामध्ये 12 वीचा गणिताचा पेपर फुटला होता. (Latest Marathi News) याची बातमी सर्वात आधी 'झी 24 तास'ने दाखवली. त्यानंतर राज्याच्या विधीमंडळातही आवाज विरोधकांकडून उठवण्यात आला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. शिक्षणाकडे सरकारचे लक्ष नाही, काय चाललंय काय? परीक्षा आहे की बाजार, असा सवालही उपस्थित करण्यात आला होता. विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरल्यानंतर अज्ञातांवर गुन्हा दाखल करुन कारवाईला वेग आलाय. या प्रकरणी बुलढाण्यातील 4 परीक्षा केंद्रांचे संचालक बदलण्यात आलेत.

'गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही'

 12 वीच्या गणिताचा पेपर (12 Maths Exam) व्हायरल झाला होता. गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पाने सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे हा पेपर पुन्हा घेण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, पेपर फुटला तरी राज्य शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, पुन्हा पेपर घेता येणार नाही. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले, गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पाने एका परीक्षा केंद्रावरुन व्हायरल झाली असल्याची बातमी टेलिव्हिजनवर दाखविण्यात आली आहे. असे असले तरी फुटलेला पेपरची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. यामुळे इयत्ता 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. HSC Exam 2023 : 12 वीचा पेपर फुटला, गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

 परभणीत बारावी इंग्रजीचा पेपर फुटला 

 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवले जात असतानाच शिक्षकांनीच या अभियानाला हरताळ फासल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील परभणीत बारावी इंग्रजीचा पेपर फुटला होता. 12वीची परीक्षा सुरु आहे. मात्र, परीक्षेत मोठा घोळ सुरु असल्याने पालकांसह विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. त्यातच पेपरफुटीमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोल सुरु असल्याची बाब पुढे आली आहे. राज्यात काही ठिकाणी पेपर लिक होण्याचा घटनेमुळे शिक्षण विभागाच्या गलथान कारभार पुढे आला आहे. दरम्यान, बारावीची परीक्षा सुरु आहे. (HSC Exam) मात्र, याआधी इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. (Maharashtra HSC Exams 2023 ) हा गोंधळ कमी की काय? आणखी एक बातमी समोर आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला होता. हा पेपर फुटल्याने परीक्षाबाबत प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यवतमाळ येथे इंग्रजीचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे.