देवेंद्र फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानावर गृहमंत्री देशमुख यांची जोरदार टीका

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानाचा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी खरपूस समाचार घेतला आहे.  

Updated: Apr 29, 2020, 10:05 AM IST
देवेंद्र फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानावर गृहमंत्री देशमुख यांची जोरदार टीका title=

जळगाव : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानाचा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी खरपूस समाचार घेतला आहे. राज्याचं पाच वर्षं नेतृत्व केलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीनेटीका करणे अयोग्य असून, आपत्तीच्या वेळी राजकारण करणे योग्य नसल्याचे अनिल देशमुख म्हणाले. 

कोरोनाच्या संकटकाळात देवेंद्र फडणवीस रस्त्यावर दिसण्यापेक्षा राजभवनात जास्त दिसतात. सध्याच्या परिस्थितीत राजकारण न करता, सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहकार्य केलं पाहिजे, असा जोरदार टोला देशमुख यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आणीबाणीसदृश परिस्थिती असल्याची टीका राज्यपालांची भेट घेऊन केली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते जळगावात बोलत होते. 

फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानाचा देशमुख यांनी  समाचार घेताना म्हटले आहे, एखाद्या ग्रामपंचायत सदस्याने किंवा नगरसेवकाने अशा पद्धतीने टीका केली तर समजू शकतो, मात्र राज्याचे पाच वर्षे नेतृत्व करणारे फडणवीसांनी अशा पद्धतीने टीका करणे योग्य नाही. आपत्तीच्यावेळी राजकारण करणे हे योग्य नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याबाबत एक सर्वंकष धोरण ठरविण्याबाबत चर्चा सुरु असे ते म्हणालेत.