हिंगणघाट जळीत प्रकरण : दोषीला कोणती शिक्षा होणार याची उत्सुकता

Hinganghat burning case: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडित प्राध्यापिकेच्या मृत्यूला आज होत आहेत. आजच दोन वर्षे पूर्ण होत असताना हिंगणघाट जळीत प्रकरणात दोषीला शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Updated: Feb 10, 2022, 12:46 PM IST
हिंगणघाट जळीत प्रकरण : दोषीला कोणती शिक्षा होणार याची उत्सुकता title=

वर्धा : Hinganghat burning case: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडित प्राध्यापिकेच्या मृत्यूला आज होत आहेत. आजच दोन वर्षे पूर्ण होत असताना हिंगणघाट जळीत प्रकरणात दोषीला शिक्षा सुनावली जाणार आहे. दोषी विक्की तथा विकेश नगराळे याच्यावर खुनाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे आता शिक्षा काय होणार याची उत्सुकता आहे. (Hinganghat burning case: Attention on what punishment the court will give to convict Vikesh Nagarale)

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या शिक्षेची सुनावणी आज होत असल्याने पीडितेचे आई-वडील आणि नातेवाईक न्यायालयात हजर आहेत. दरम्यान, दोषी विकी नगराळे न्यायालयात हजर आहे. तसेच विशेष सरकारी वकील उज्वल निकम हेही न्यायालयात उपस्थित आहेत. काही वेळात शिक्षा सुनावणीस सुरुवात होणार आहे.

 हिंगणघाट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आज कोणती शिक्षा होणार याबाबत ही सुनावणी होणार आहे. हिंगणघाट येथील नांदोरी चौकात पेट्रोल टाकून पीडितेला जाळण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारी वकिलाच्या विनंतीवरून एक दिवस निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार आज सर्व जनतेला निर्णयाची प्रतीक्षा आहे.

दोषी विकेश नगराळे याला शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याने हिंगणघाट न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पीडित प्राध्यापक गाव असलेल्या दारोडा या गावात देखील मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज  दुपारी दोन वाजेपर्यंत न्यायालयाच्या सभोवतालची दुकाने राहणार बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच परिसरातील शासकीय कार्यालये देखील दुपारपर्यंत राहतील बंद असणार आहेत.

दोषी विकेश नगराळे याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आजच्याच दिवशी पीडित प्राध्यापिकेचा मृत्यू  झाला होता. तब्बल दोन वर्षांनंतर आज मृत्यूच्या दिवशीच दोषीला शिक्षा सुनावली जात आहे. यापार्श्वभूमीवर हिंगणघाट शहरात कायदा आणि सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.