हिंगणघाट जळीतकांड : पीडित शिक्षिकेची प्रकृती गंभीर

सर्वसामान्य कुटुंबातील या तरुणीची स्वप्नांची भरारी घेण्याची जिद्द...

Updated: Feb 10, 2020, 07:40 AM IST
हिंगणघाट जळीतकांड : पीडित शिक्षिकेची प्रकृती गंभीर  title=

नागपूर : हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेबाबत झालेल्या ह्रदयद्रावक घटनेचे तीव्र पडसाद अवघ्या महाराष्ट्रभर उमटले आहे. तिची तब्येत अधिक गंभीर झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील या तरुणीची स्वप्नांची भरारी घेण्याची जिद्द अनोखी असल्याचं तिच्या शिक्षकांनी सांगितलंय. अत्यंत शांत आणि मनमिळावू स्वभावाच्या या तरुणीला शिक्षिकाच व्हायचं होतं. 

आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं हे ती नेहमी म्हणत असे. अशा अनेक आठवणी तिच्या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितल्यात. तिची प्रकृती खालावली असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तर रविवारी तिच्यावर चौथी शस्त्रक्रिया पार पडली. 

हिंगणघाट जळीत कांडप्रकरणातील पीडितेच्या तब्येतीचा अहवाल समोर आला आहे. प्रकृती स्थिर असली तरी नाजूक आहे. एकतर्फी प्रेमातून पीडित तरुणीला जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीडितेची प्रकृती स्थिर पण चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

संतापाची लाट  
हिंगणघाट शहरात नागरिकांचा मोर्चा सुरु झाला असून यामध्ये विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हिंगणघाटमधल्या तरुणामध्ये या घटनेबाबत संतापाची लाट पसरली आहे.