HAL Job 2023 : आयटीआय, डिप्लोमाधारक तरुणांसोबत पदवीधरांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस पदाची भरती केली जाणार आहे. या पदाच्या तब्बल 647 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदवीधर अप्रेंटिसच्या एकूण 186 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित इंजिनीअरिंग ब्रांचमध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9 हजार इतका पगार दिला जाणार आहे.
डिप्लोमा अप्रेंटिसच्या एकूण 111 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित विषयात डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 8 हजार इतका पगार दिला जाणार आहे.
आयटीआय अप्रेंटिसच्या एकूण 350 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 8 हजार इतका पगार दिला जाणार आहे.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक येथे काम करावे लागेल. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. 23 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
शीव रुग्णालयाअंतर्गत स्त्री रोग आणि प्रसुती विभागात सहायक प्राध्यापक पदाच्या 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे ते कमाल वय 38 वर्षापर्यंत असावे. मागासवर्गीय उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 580 रुपये अधिक जी.एस.टी. (18% GST) इतके परीक्षा शुल्क घेण्यात येणार आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तसेच त्यांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी अधिष्ठाता, लो. टि. म स . रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड,शीव, मुंबई – 400022 या पत्त्यावर उपस्थित राहावे. याबद्दलची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट www.portal.mcgm.gov.in वर अधिक तपशील देण्यात आला आहे.