हाय कोर्टाकडून डीएसकेंना पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा

 देशभरातली सर्व खाती गोठवल्यामुळे ही रक्कम जमा करण्यासाठी अडचणी येत असल्याचं याचिकाकर्त्यांनी कोर्टात सांगितलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 22, 2018, 07:24 PM IST
हाय कोर्टाकडून डीएसकेंना पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा title=

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाकडून डीएसकेंना पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा मिळालाय. दिलेल्या निर्देशांप्रमाणे २५ जानेवारीपर्यंत पैसे भरण्याची मुदत डी. एस. कुलकर्णी यांना वाढवून देण्यात आलीय. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी डीएसकेंना ५० कोटी रूपये भरण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत. 

डीएसकेंना ५० कोटी रूपये भरण्याचे निर्देश

न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे.  मात्र देशभरातली सर्व खाती गोठवल्यामुळे ही रक्कम जमा करण्यासाठी अडचणी येत असल्याचं याचिकाकर्त्यांनी कोर्टात सांगितलं. 

डीएसकेंना 25 जानेवारीपर्यंतची अखेरची संधी

मात्र ही रक्कम जमा करण्यासाठी कोर्टानं डीएसकेंना 25 जानेवारीपर्यंतची अखेरची संधी दिलेली आहे.  तसेच या व्यवहारावर लक्ष ठेवण्याचे तपासयंत्रणेला निर्देश देण्यात आलेत. २५ जानेवारीला डीएसकेंच्या अटकपूर्व जामिनावर हायकोर्टात पुन्हा होणार सुनावणी होईल.