अंबरनाथ : अतिप्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्द्दी आहे. दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्री पासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक इथं दर्शनाला येतात.
मध्यरात्री 12 वाजता शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला. अंबरनाथाचं हे हेमाडपंथी मंदिर शिलाहार राजा मुम्बानी याने 957 वर्षांपूर्वी बांधलंय. युनोस्कॉनं जाहीर केलेल्या भारतातील पुरातन मंदिरांच्या यादीत याचा समावेश आहे.
बाराजोर्तिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या भिमाशंकरचं मंदिर महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांनी फुलून गेलं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भिमाशंकर मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामधल्या भीमाशंकरमध्ये महाशिवरात्री निमित्ताने पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटे शिवलिंगाची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला.
दर वर्षी महाशिवरात्रीला हर हर महादेवच्या गजरानं दुमदुमणाऱ्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भविकांनी गर्दी केलीय. महाशिवरात्री निमित्ताने १२ ज्योतिर्लींगापैकी एक असणा-या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली.
भारतातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी आठवे ज्योतिर्लिंग असणा-या औंढा नागनाथ इथे महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. औंढा नागनाथमध्ये भारुखनाथांचं पांडवकालीन मंदिर आहे.
हिंदू धर्मात महाशिवरात्रीला मोठं महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त देशभर शिव मंदिरात जाऊन भाविक शिवलिंगावर अभिषेक करतात. महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी गर्दी केलीये. रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात. पहाटे शिवलिंगाची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला.
बाबूलनाथ मंदिरात अभिषेक करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दरवर्षी महाशिवरात्रीला याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदाही भाविकांनी बाबूलनाथ मंदिरात दर्शनासाठी करण्यासाठी चांगलीच गर्दी केली आहे.