राज्यातील 'या' जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस

राज्यात उष्णतेमुळे सर्वांना नकोसं झालंय. गरम्यामुळे शरीराची लाहीलाही होतेय. फक्त चातकच नाही, तर सर्वसामान्यही पावसाची आतुरतेने वाट पाहतायेत.

Updated: May 11, 2022, 10:08 PM IST
राज्यातील 'या' जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस title=
प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली :  राज्यात उष्णतेमुळे सर्वांना नकोसं झालंय. गरम्यामुळे शरीराची लाहीलाही होतेय. फक्त चातकच नाही, तर सर्वसामान्यही पावसाची आतुरतेने वाट पाहतायेत. तसेच यंदा समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात 10 दिवस पाऊस आधी येणार असल्याचं म्हटलं होतं. पण आज सांगलीत अचानक दमदार वादळी पाऊस झाला. (heavy rains lashed sangli district this evening)

जिल्ह्यात आज संध्याकाळनंतर दमदार वादळी पाऊस झाला. जिल्ह्यात दुपारनंतर सर्वत्र ढगाळ वातावरण  होतं. शहरी भागात मिरज, सांगली इथून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पाऊस पडला. अचानक झालेल्या यामुळे उष्णतेने हैराण झालेल्यांना दिलासा काही वेळ का होईना, दिलासा मिळाला.