नाशकात विक्रमी पावसाची नोंद, इतक्या मिलिमीटर पावसाची नोंद

नाशिक जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात विक्रमी 726 मिलिमीटर पावसाची  नोंद झाली आहे.

Updated: Jul 8, 2019, 11:07 AM IST
नाशकात विक्रमी पावसाची नोंद, इतक्या मिलिमीटर पावसाची नोंद  title=

योगेश खरे, झी 24 तास, नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात विक्रमी 726 मिलिमीटर पावसाची  नोंद झाली आहे. त्रंबकेश्वरमध्ये 200 मिली मीटर तर नाशिक शहरामध्ये102 मिलिमीटर मुसळधार पाऊस नोंदवला गेला आहे. यामुळे धरण साठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या 24 तासापासून 8 क्यूसेक्स वेगाने पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे.

दारणा धरणातील पाणीसाठा देखील चांगला वाढला आहे. आज सकाळपासून दहा हजार क्युसेक्स वेगाने पाणी नांदूर-मधमेश्वर धरणातून मराठवाड्यामध्ये जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडीला पाणी आवक सुरू होणार आहे. गंगापूर धरण समूहात असलेल्या तीनही धरणांमध्ये पाणीसाठा 25 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. तर गंगापूर धरण धरणात 24 तासात 18 टक्के पाणीसाठा वाढत 34 टक्के झाले आहे.