नागपूर : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला खाजगी ट्रॅव्हल बसनं दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू तर 10 जण जखमी झालेत. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या पचगाव शिवारात रविवारी रात्री घडली. महालक्ष्मी ट्रॅव्हलची ही बस ब्रम्हपुरीवरून नागपूरला येत असताना उमरेड मार्गावर पचगाव शिवारात रस्त्यावर उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकला भरधाव बसने धडक दिली. या अपघातात बसच्या चालकासह बसमधील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
रविवारी रात्री नागपुरच्या दिशेने यायला ही बस निघाली होती. दहा ते बारा जण यामध्ये गंभीर जखमी आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेतीची वाहतूक करणारे ट्रक या महामार्गावर उभे असल्याने याआधीही असे अपघात झाले आहेत. त्यामुळे या ट्रक्सवर कारवाई होणे गरजेचे आहे.