चाळीसगाव पाटणादेवी परिसर ढगफुटीमुळे उध्वस्त; पाहा सद्यस्थितीचे फोटो

जिह्यातील चाळीसगाव तालूक्यातील प्रसिद्ध तीर्थ स्थळ असलेल्या पाटणादेवी परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला.

Updated: Aug 31, 2021, 10:24 AM IST
चाळीसगाव पाटणादेवी परिसर ढगफुटीमुळे उध्वस्त; पाहा सद्यस्थितीचे फोटो title=

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून ढगफुटी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठा पूर आला असून यामुळे चाळीसगाव शहराच्या काही भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तर कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. प्रसिद्ध पर्यटनस्थळ तसेच तीर्थस्थळ असलेल्या चाळीसगाव तालूक्यातील पाटणा गावाजवळ ढगफुटी झाल्याची माहिती समोर येत आहे.

जिह्यातील चाळीसगाव तालूक्यातील प्रसिद्ध तीर्थ स्थळ असलेल्या पाटणादेवी परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला.

सोमवारी रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाटणा गावाच्या आजुबाजूचा परिसर आणि पाच गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जळगाव आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांना जोडणारा कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पाटणादेवी परिसरातील पाच गावे पूराच्या पाण्याने वेढली गेली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. 

मुसळधार पावसामुळेच कन्नड घाटामध्ये दरड कोसळली असून यामुळे रात्रीपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे. आता देखील पाऊस सुरू असल्याने रस्ता दुरूस्त करण्यात अडचणी येत आहेत.