देवा तुला शोधू कुठं! त्र्यंबकेश्वरचं मंदिरही जलमय

शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे विविध ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. देशासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांना पूराचा तडाखा बसला आहे. ज्यामध्ये नाशिकचाही समावेश आहे. काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसाचा जोर नाशिकमध्ये अद्यपही कायम आहे. परिणामी येथील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. 

Updated: Aug 4, 2019, 11:36 AM IST
देवा तुला शोधू कुठं! त्र्यंबकेश्वरचं मंदिरही जलमय  title=

मुंबई : शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे विविध ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. देशासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांना पूराचा तडाखा बसला आहे. ज्यामध्ये नाशिकचाही समावेश आहे. काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसाचा जोर नाशिकमध्ये अद्यपही कायम आहे. परिणामी येथील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. 

पावसाचा चोर पाहता गंगापूर धरणातून १८ हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे. परिणामी गोदावरी नदीने रौद्र रुप घेतलं आहे. ज्यामुळे सायखेडा पूल पाण्याखाली गेला आहे. तर, रामकुंडावर २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे १२ तासांपासून परिस्थिती जैसे थे आहे.

फक्त धरण परिसरातच नाही, तर देवाच्या दारीसुद्धा पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरातसुद्धा पाणी शिरलं आहे. मंदिर परिसरात असणाऱी अनेक घरंही जलमय झाली आहेत. 

एएनआय या वृत्तसंस्थेने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो पाहता पाण्याची एकंदर पातळी आणि पावसाचं प्रमाण यांचा सहज अंदाज लावता येत आहे.  सुद्धा जलमय झालंय. त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरलंय. अनेक घरांमध्येही पाणी शिरलं आहे.