उष्णतेचा कहर! भंडाऱ्यात एका दिवसात 1531 कोंबड्यांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात पारा 45 अंशांवर गेल्यानं, उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. त्याचाच भाग म्हणून 25 मे ते 3 जूनदरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.

Updated: May 26, 2024, 10:41 PM IST
उष्णतेचा कहर! भंडाऱ्यात एका दिवसात 1531 कोंबड्यांचा मृत्यू  title=

Heatwave in Maharashtra : भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ इथे उष्माघाताने 1531 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये पोल्ट्री फॉर्म मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झालं. राज्यभरात उष्माघातामुळे हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ येथील सतीश वाघाये यांच्या पोल्ट्री फॉर्म मधील उष्माघाताने 1531 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये पोल्ट्री फॉर्म मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सद्या उन्हाचा पारा चढला असून सर्वत्र लाहीलाही पहायला मिळते. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरीक सीतपेयाकडे आकर्षित होत आहेत. तर दूसरीकडे या उन्हाच्या तडाख्यामुळे 1531 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महत्त्वाचे काम असले तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आव्हान जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

वर्ध्यात उष्मघाताने दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू

वर्ध्यात उष्मघाताने दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. वर्ध्याच्या वायफड गावातील पोल्ट्री फॉर्म येथील या कोंबड्या आहेत. यामुळे पोल्ट्री फॉर्म व्यावसाईकांचे जवळपास 3 लाखांचे नुकसान झाले आहे. दुपारी दोन तास विद्युत पुरवठा बंद झाल्याने कोंबड्याचा मृत्यू झाल्याचे समजते. 

200 कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू

उष्माघातामुळे तब्बल बाराशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या पलूस तालुक्यातील आंधळी येथे घडली.  सीताराम भगवान जाधव यांच्या  यांच्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या शेडमधील एकूण 4200 पक्ष्यांपैकी 1200 कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला आहे.  त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. मंगळवारी भर दुपारी अचानकपणे लोडशेडिंग झाले यातच उष्णतेचे प्रमाण वाढले,यामुळे उष्माघाताने जाधव यांच्या कोंबड्या दगावल्या. 
 वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून सूर्य आग ओकत आहे. काल यंदाच्या वर्षातील उच्चाकी 44 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.मालेगाव तालुक्यात असलेल्या ग्राम बोरगाव येथील कडुजी गोविंदा गुडदे या 65 व्यक्ती बकऱ्या चारण्याकरिता तपोवन शेतशिवारात गेले असताना ऊणाचा फटका लागून मृत्यू झाल्याची घटना आज घडल्याने जिल्ह्यात उष्मघाताचा पहिला बळी गेला आहे.त्यामुळे बोरगाव गावंत हळहळ व्यक्त केली जातं आहे.

अकोला  विदर्भात सर्वाधिक उष्ण शहर 

अकोला जिल्ह्यातील तापमानाचा पारा 44 ते 45.8 अंश सेल्सिअसपर्यंत जातोय. त्यामुळे विदर्भात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून अकोल्याची नोंद झालीय. याच पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका पाहता अकोला जिल्ह्यात ३१ मेपर्यंत कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलेत. प्रादेशिक हवामान विभाग नागपूरनुसार 31 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.