H3N2 Virus Maharashtra On High Alert : देशावर सध्या ट्रिपल व्हायरसचं संकट घोंघावत आहे. H3N2 व्हायरसचा धोका लक्षात घेता. H3N2 व्हायरस संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी दिली.
या व्हायरसा धोका आणि वाढता फैलाव लक्षात घेता सर्वच आरोग्य यंत्रणांना या व्हायरस वर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. विशेषत: ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये जास्त लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या व्हासरसचा प्रसार वाढू नये यासाठी काळजी घ्यावी. या संदर्भात खबरदारी घेण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात यावे अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या आहेत. अद्यापि कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत.
राज्याच्या विधानसभेतही H3N2 इन्फ्लूएन्झा व्हायरसवर मुद्दा उपस्थित करण्यात आला. सरकारने यावर निवेदन करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली. राज्यात सध्या H3N2 चे 170 रुग्ण आहेत. तेव्हा राज्य सरकारने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणीही अजित पवारांनी केली.
देशात H3N2 व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. या व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नीती आयोगानं महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, गर्दीची ठिकाणं टाळण्याच्या सूचना नीती आयोगाने केल्या आहेत. लहान मुलं आणि ज्येष्ठांना लागण झाल्यास काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचे रूग्णही काही राज्यात वाढले आहेत, त्यावरही चिंता व्यक्त करण्यात आली.
कोरोनाची साथ आटोक्यात येत नाही, तोच आता आणखी एका खतरनाक व्हायरसचा उद्रेक झाला आहे. H3N2 एन्फ्लूएन्झा या नव्या व्हायरसने चिंता वाढवली आहे. देशभरात या फ्लूचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. कर्नाटक आणि हरयाणा या राज्यांमध्ये फ्लूनं दोन बळी देखील घेतले आहेत. शेकडो रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विशेषतः गर्भवती महिला, 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांमध्ये हा फ्लू झपाट्यानं पसरत आहे. एवढंच नव्हे तर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांमध्येही एन्फ्लूएन्झा संक्रमित होण्याचा धोका जास्त आहे.