मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवा व्हायरस XE सापडला. यामुळे पुन्हा एकदा जगभरात चिंता वाढली होती. दरम्यान गुरुवारी कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट XE मुंबईत आढळून आल्याची चर्चा होती. मात्र केंद्र सरकारने हा दावा फेटाळून लावला होता. यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोनाच्या XE व्हेरिएंटबाबत NIV आणि कस्तुरबा हॉस्पिटलकडून अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात घाबरण्याची गरज नाही. हा XE व्हेरिएंट Omicron पेक्षा 10% अधिक घातक आहे. केंद्राकडूनही आम्हाला यासंदर्भात कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही.
मुंबईत कप्पा आणि XE या कोरोना व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याचा मुंबई महापालिकेकडून दावा करण्यात आला होता. यानंतर मात्र केंद्रीय संस्थेनं मुंबई महापालिकेचे हे दावे फेटाळून लावले. मुंबई सापडलेल्या रूग्णाच्या अहवालात XE व्हेरियंट नसल्याचा इन्साकॉगकडून सांगण्यात आलंय.
वर नमूद केलेली ही लक्षणे कोरोना संसर्गाच्या अधिकृत लक्षण यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा ही लक्षणे दिसतात तेव्हा त्या व्यक्तीने घरीच थांबावे. त्याच वेळी, कोणताही विलंब न करता, डॉक्टरांशी संपर्क साधावा.