अल्पवयीन मुलीला फिरायला घेऊन गेला आणि त्याने असं कृत्य करून नात्याला काळिमा फासला...

नात्यातील एका अल्पवयीन मुलीला डोंगरावर फिरण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा पोलीस शोध घेत आहेत.

Updated: May 23, 2022, 07:01 PM IST
अल्पवयीन मुलीला फिरायला घेऊन गेला आणि त्याने असं कृत्य करून नात्याला काळिमा फासला... title=

पुणे : नात्यातील एका अल्पवयीन मुलीला डोंगरावर फिरण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा पोलीस शोध घेत आहेत. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही घटना उघडकीस आली.

या घटनेबाबत पीडित मुलीच्या आईने म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी श्रीकांत तिटकरे ( वय 25 वर्ष ) या तरुणाविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार नोव्हेंबर 2021 मध्ये निघोज गावच्या हद्दीतील डोंगरावर घडला. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपी श्रीकांत तिटकरे याने नोव्हेंबर 2021 मध्ये फिर्यादी यांच्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गावातील डोंगरावर फिरायला नेले.

डोंगरावर गेल्यावर त्याने संधी साधून त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ती पीडित मुलगी 8 महिन्यांची गरोदर राहिल्याने तिच्या आईने आधी चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे आईने पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.