हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, ठाणे-सीएसमटी सेवा ठप्प

हार्बर रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पनवेल येथे सकाळी रुळाला तडे गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 10, 2017, 10:11 AM IST
हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, ठाणे-सीएसमटी सेवा ठप्प title=

मुंबई : हार्बर रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पनवेल येथे सकाळी रुळाला तडे गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. 

पनवेलकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाण्याचा दिशेने जाणाऱ्या गाड्या बंद आहेत. त्यामुळे सकाळी नोकरीवर जाणाऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय.

दरम्यान, बेलापूर, वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाण्याकडे जाणारी सेवा सुरु आहे. त्यामुळे काही प्रवाशांना दिलासा मिळालाय.