आंबेजोगाईतील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा, डाव्या कालव्यातून पाणी!

आंबेजोगाई (Ambejogai) तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा पाककमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिला आहे. 

Updated: Jan 22, 2021, 02:04 PM IST
आंबेजोगाईतील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा, डाव्या कालव्यातून पाणी!  title=
संग्रहित छाया

विष्णू बुरगे, बीड : आंबेजोगाई (Ambejogai) तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा पाककमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिला आहे. मुंडे यांच्या प्रयत्नामुळे  हजारो शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी धनेगाव धरण (Dhanegaon Dam) डाव्या कालव्याचे (Dhanegaon Dam) पाणी सोडावे अशी मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर अखेर डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. 

धनेगाव धरणाच्या (Dhanegaon Dam) डाव्या कालव्यामध्ये (left canal) पाणी सोडा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. ग्रामस्थांना आपले गाऱ्हाने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यापुढे मांडले. मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे धरणाच्या डाव्या कालव्यांमधून पाणी आता शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. याचा फायदा ऊस शेतकऱ्यांना होणार आहे.

ऊसाची मोठी शेती या डाव्या कालव्याच्या लगत होत असते. त्यामुळे अनेकांना पाणी येण्याची वाट वाट पाहावी लागते. दरवर्षी रोटेशन पद्धतीने पाणी दिले जाते मात्र या वर्षी कुठलाही रोटेशन टाकण्यात आलं नव्हते. परिणामी पाणी सुटेल की नाही याची शाश्वती शेतकऱ्यांना नव्हती. शेतकऱ्यांनी याप्रश्ना आवाज उठवला होता. मात्र याची कुठलीही दखल कोणी घ्यायला तयार नव्हते. आता हा प्रश्न मिटला आहे.

धनेगाव धरणाच्या आधारित आंबेजोगाई तालुक्यातील अनेक शेतकरी हे ऊसाचे पीक घेतात या उसाच्या पिकाला पाण्याची आवश्यकता असते, हे पाणी वेळेस जर मिळाले तर चांगलं उत्पन्न मिळते, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऊसाची लागवड केली जाते. या वर्षी ठरलेल्या वेळेत पाणी न आल्यामुळे अनेकांची ऊस वाढण्याची वेळ आली होती. मात्र आता पाणी येणार असल्यामुळे दिलासा मिळणार आहे.