निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोट्यवधीच्या बोली लागलेल्या आपण महाराष्ट्रात पाहिल्या. लोकशाहीची अक्षरशः हत्या केली जात होती. अशा वेळी नाशिक जिल्ह्यातल्या एका गावानं कमाल केलीय आहे. दहा वीस वर्षं नव्हे तर तब्बल पन्नास वर्षं या गावात बिनविरोध निवडणूक होते.
नाशिकच्या नांदगांव तालुक्यातली बाणगाव खुर्द आणि बाणगाव बुद्रुक ही दोन गावं. १९७० मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत गावात मोठ्या प्रमाणावर हाणामारी झाली. टोकाचे वाद झाले, गावात गट पडले. अनेक वर्षं अबोला होता. पण त्यातून धडा घेऊन पुढची ग्रामपंचायत निवडणूक गावानं बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत गावाची हीच परंपरा आहे.
गावात सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नेते आहे. मात्र ग्रामपंचायत, सोसायटीसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत राजकीय जोड़े बाजुला काढून निवडणूक बिनविरोध होते. जेव्हढया जागा आहेत तेवढेच उमेदवारी अर्ज भरले जातात. यंदाही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बाणगाव खुर्दची निवडणूक बिनविरोध झाली निवडणूक आली की सगळ्या समाजांमधले लोक बानेश्वर मंदिरात जमतात.
सर्व घटकांना न्याय देत निवडणूक बिनविरोध होते. पूर्वी माजी खासदार अण्णासाहेब कवडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ही प्रक्रिया सुरु होती. आता त्यांचे चिरंजीव बापूसाहेब कडवे यांच्या नेतृवाखाली ही बिनविरोध निवड़ीची परंपरा सुरु आहे. विशेष म्हणजे बापूसाहेब कवडे यांच्या कुटुंबातून कुणीही ग्रामपचायतीसाठी उमेदवारी करीत नाही.
एककीकडे सरपंच पदासाठी कोटी कोटी रूपयांची बोली लागत आहे. आणि लोकशाहीचा लिलाव होत आहे. निवडणुकीसाठी साम, दाम, दंड भेद वापरलं जात आहे. अशा वेळी नांदगावमधल्या पणाला लावलं जातंयअशा वेळी लागत आहे. तर निवडणुक जिंकण्यासाठी साम,दाम, दंड, भेद वापरलं जात असतांना बाणगावची ही बिनविरोध निवडणुकीची परंपरा ठसठशीत उठून दिसते. लोकशाहीचा लिलाव करणाऱ्याच्या डोळ्यांत हे झणझणीत अंजन आहे.