Gram Panchayat Election : भावाचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन! पत्नीच्या विजयासाठी शपथच तशी घेतली होती

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत, अशातच काही निकाल लक्षवेधी ठरत आहेत, पंढरपूरमधल्य त्या निकालाची तर गावभर चर्चा  

Updated: Dec 20, 2022, 02:07 PM IST
Gram Panchayat Election : भावाचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन! पत्नीच्या विजयासाठी शपथच तशी घेतली होती title=

Gram Panchayat Election : महराष्ट्रात सध्या ग्रामपंचायतींच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Gram Panchayat Result) राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल (Gram Panchayat Result) लागत आहेत. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. निकाल समोर येताच विजेते उमेदवार वेग-वेगळ्या अंदाजात आनंद साजरा करताना दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. पण यावेळी दिग्गजांची प्रतिष्ठा निवडणुकीत पणाला लागलेली असते.

गावपातळीवर सरपंच आणि आपलं पॅनल जिंकण्यासाठी कार्यकर्ते प्रचंड मेहनत करत असतात. प्रचारासाठी दारो-दारी जावून मतदारांना मत देण्यासाठी विनंती करत असतात. तर काही कार्यकर्ते जिंकण्यासाठी नवस देखील करतात. याचंच एक उदाहरण पंढरपुरात पाहायला मिळालं. 

पंढरपुरातील आजोती ग्रामपंचायतीवर  राष्ट्रवादी काँग्रेसनं (ncp activist) विजय मिळवला आहे. महत्त्वाचं म्हणजे सरपंच झाल्याशिवाय केस-दाढी न काढण्याचा निर्धार अमरजित पवार यांनी केला. अखेर यंदाच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. आजोती ग्रामपंचायतीवर पवार यांच्या पत्नीचा विजय झाला आहे. 

वाचा | Maharashtra Gram Panchayat Election Result : आतापर्यंत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल हाती; पाहा एका क्लिकवर

पत्नीचा विजय होताच अमरजित पवार (Amarjeet Pawar) आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला आहे. मोठ्या आनंदात अमरजित पवार  यांनी अखेर नवस पूर्ण झाल्याचं सांगितलं. एवढंच नाही, तर त्यांनी आनंदाच्या क्षणी भावना देखील व्यक्त केल्या आहेत. पत्नीच्या विजयानंतर अमरजित पवार यांनी पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केलं आहे.  (Amarjeet Pawar wife) 

अमरजित पवार म्हणाले, 'निवडणुकीत पिण्याचं पाणी, अंतर्गत गटारे आणि पक्के रस्ते देण्याचं वचन गावकऱ्यांना दिलं होतं. गावकऱ्यांनी आम्हाला निवडून दिलं. निवडून आल्यानंतर माझे केस आणी दाढी तिरुपतीच्या चरणी अर्पण करेन असा नवस केला आणि आज ग्रामस्तांनी माझा नवस पूर्ण केला आहे...' असं देखील अमरजित पवार म्हणाले

दरम्यान, राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल (Gram Panchayat Result) लागत आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. (Maharashtra Political News) यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. 

विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाबरोबरच (Shinde Group) प्रत्येक पक्षातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.