बलात्कार पीडितेच्या वाहनाला लावले GPS; जामीनावर सुटल्यानंतरही पाळत ठेवत होता आरोपी

Pune News : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने बलात्कार पीडितेवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या वाहनाला GPS लावले आहे. 

Updated: Feb 19, 2024, 03:50 PM IST
बलात्कार पीडितेच्या वाहनाला लावले GPS; जामीनावर सुटल्यानंतरही पाळत ठेवत होता आरोपी title=

Pune Crime News :  जामीनावर सुटल्यानंतरही आरोपी बलात्कार पीडितेवर पाळत ठेवून होता. आरोपीने बलात्कार पीडितेच्या वाहनाला GPS लावले होते. ही बाब लक्षात येताच पीडितीने आरोपी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. 

कारागृहातून बाहेर आल्यानंतर आरोपी तरुणाचे धक्कादायक कृत्य

बलात्कार तसेच आठ लाखांचे दागिने घेऊन फसवणूक करणाऱ्या तरुणाने कारागृहातून जामीनावर बाहेर आल्यानंतर पिडीत तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला ''''जीपीएस'''' लावl तिचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. तरुणीला ही बाब समजताच तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तरुणावर गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी लखन महादेव भिसे (वय 25 वर्षे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 23 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार

आरोपी लखन हा बारामतीच्या पिंपळी येथे राहाणारा आहे. तर, तक्रारदार पिडीत तरुणी शुक्रवार पेठेत राहते. तक्रारदार तरुणी एका खासगी कंपनीत नोकरी करते. लखन भिसे आणि या पिडीत तरुणीची गेल्या वर्षी विवाह संकेतस्थळावरून ओळख झाली होती. अनोळखीनंतर त्यांच्यात मैत्री झाली. लखन याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तसेच, तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यासोबतच वेगवेगळी कारणे सांगत तिच्याकडून 8 लाख तीन हजार रुपयांचे दागिने घेतले होते. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. तसेच, दागिनेही परत केले नाहीत.  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने खडक पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानूसार पोलिसांनी भिसेवर फसवणूक, बलात्कार, अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखलकरून त्याला अटक केली. 

जामीनावर बाहेर आल्यानंतर पीडितेचा पाठलाग

अटकेनंतर तो न्यायालयीन कोठती गेला. तो कारागृहातून नुकताच जामीनावर बाहेर आला आहे. दरम्यान, खडक पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच लखन बाहेर आला आणि पुन्हा त्याने या तरुणीचा पाठलाग सुरू केला. त्याने यादरम्यान नामी शक्कल लढवली. त्याने तरुणीवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या नकळत दुचाकीला ''''जीपीएस'''' लावले व तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरू केले. तसेच तिचा चोरून पाठलाग केला. तरुणीच्या लक्षात हा प्रकार आला. तेव्हा तिने पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, तरुणीच्या दुचाकीवरून जीपीएस काढले असून, ते तपासणीसाठी पाठवले आहे. सिमकार्ड कोणाच्या नावावर आहे, याची माहिती मागवली आहे, अशी माहिती उपनिरीक्षक स्वाती भोरड यांनी दिली.