नियम म्हणजे नियम, यांना मास्क न लावणे आणि रस्त्यावर थुंकणे पडले महाग!

नियम हे सर्वांना सारखेच असतात मग तो सामान्य माणूस असो अथवा सरकारी कर्मचारी.  

Updated: Apr 23, 2020, 04:11 PM IST
नियम म्हणजे नियम, यांना मास्क न लावणे आणि रस्त्यावर थुंकणे पडले महाग! title=

रत्नागिरी : नियम हे सर्वांना सारखेच असतात मग तो सामान्य माणूस असो अथवा सरकारी कर्मचारी. नियम म्हणजे नियम, हे दाखवून दिलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलिसांनी. मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असताना कोरोना भरारी पथकाच्या शासकीय वाहनातून जाणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मास्क न लावणे आणि रस्त्यावर थुंकणे चांगले महागात पडले. पोलिसांनी चांगलीच समज देऊन सोडून दिले.

सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांने कोरोनाच्या संकटात मास्क तोंडाला लावला नव्हता. तसेच अधिकारी रस्त्यावर तोंडातील साठविलेला तोब्रा थुंकला. याप्रकरणी पोलिसांनी चांगलीच शिक्षा लावली. रस्त्यावर थुंकताना आणि तोंडाला मास्क लावला नसल्याची बाब डीवायएसपी प्रवीण पाटील यांच्या लक्षात आली. पोलिसांनी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्याला गाडी थांबवायला सांगितले. हे दोघेही शासकीय कर्मचारी गाडीतून उतरले आणि पुन्हा रस्त्यावर थुंकले. हे पाहून डीवायएसपी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की या चांगल्या संतापल्या. 

सर्वांसमोर घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर थुंकणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्याच हात रुमालाने रस्ता साफ करायला लावले. तसेच जिल्ह्यात थुंकण्यास देखील बंदी असल्याने तसेच तोंडाला मास्क लावणे अनिवार्य असल्याने  त्याचे गांभीर्य सांगून त्यांना एकदा समज देत नंतर सोडण्यात आले.