Government Job: महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत मेगाभरती, नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023:  महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 1782 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 20 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

Pravin Dabholkar | Updated: Jul 15, 2023, 04:18 PM IST
Government Job: महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत मेगाभरती, नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज  title=

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: सराकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. त्यांची चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळविण्याची इच्छा आता पूर्ण होणार आहे. तरुणांना महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.  

इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 1782 जागा भरल्या जाणार आहेत. स्थापत्य अभियंता, गट-क च्या एकूण 291 जागा भरल्या जाणार असून पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा   आणि MS-CIT किंवा त्या समतुल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्युत अभियंता, गट-क च्या एकूण 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MS-CIT पूर्ण असणे आवश्यक आहे. कॉम्प्युटर इंजिनीअर,ग्रुप सीच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार असून उमेदवाराने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण करणे आवश्यक आहे. 

पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-कच्या एकूण 65 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा  आणि MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लेखापरीक्षक/लेखापाल,गट-कच्या एकूण 247 रिक्त जागा भरल्या जाणार असून उमेदवार बीकॉम आणि एमसीआयटी पूर्ण असणे आवश्यक आहे. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-कच्या एकूण 579 रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. 

अग्निशमन अधिकारी, गट-कच्या एकूण 372 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी  पूर्ण असणे आवश्यक आहे.  स्वच्छता निरीक्षक ग्रुपसीच्या एकूण 35 जागा भरल्या जाणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. 

वयोमर्यादा

महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 38 वर्षांदरम्यान असावे.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 1000 रुपये परीक्षा फी घेतली जाईल. तर मागासवर्गीय उमेदवारांना यात 100 रुपये सवलत दिली जाणार आहे. 

अर्जाची शेवटची तारीख

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 20 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा