कोयना धरणात चांगला पाणीसाठा, वीज निर्मिती संकट टळणार

कोयना धरणात तब्बल 64.10 टीएमसी  पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 22 टीएमसी पाणीसाठा जास्त असल्याने या वर्षासह आगामी वर्षाचाही पाणीप्रश्‍न निकाली निघणार आहे. चालूवर्षी पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसह पूर्वेकडील सिंचनासाठीही गेल्यावर्षीपेक्षा 15.27 टीएमसी कमी पाण्याचा वापर झाल्याने स्वाभाविकच 625 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली. 

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 6, 2018, 04:10 PM IST
कोयना धरणात चांगला पाणीसाठा, वीज निर्मिती संकट टळणार title=

सातारा : कोयना धरणात तब्बल 64.10 टीएमसी  पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 22 टीएमसी पाणीसाठा जास्त असल्याने या वर्षासह आगामी वर्षाचाही पाणीप्रश्‍न निकाली निघणार आहे. चालूवर्षी पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसह पूर्वेकडील सिंचनासाठीही गेल्यावर्षीपेक्षा 15.27 टीएमसी कमी पाण्याचा वापर झाल्याने स्वाभाविकच 625 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली. 

चालू वर्षभरात पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. आत्तापर्यंत यापैकी 44.71 टीएमसी  पाणीवापर झाला असून या कोठ्यापैकी 22.79 टीएमसी पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. त्यामुळे शिल्लक कोठा लक्षात घेता येणार्‍या काळात इथे सरासरीपेक्षाही चार पटीने ज्यादा वीजनिर्मिती करणे शक्य आहे. 

धरणात सध्या 64.10 टीएमसी  पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील दोन महिन्यांसाठी पश्‍चिमेकडील आरक्षित 22.79, सिचंनासाठी पूर्वेकडील 15.50 तर मृतसाठा 5 अशा एकूण 43.29 टीएमसी पाणीवापरानंतरही धरणात जवळपास 20 ते 22 टीएमसी पाणी शिल्लक रहाणार आहे. त्यामुळे एक जूनपासून सुरू होणार्‍या नव्या तांत्रिक वर्षात जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही तरी त्याकाळात विजेची आणि सिंचनाची गरज भागविण्यासाठी हा शिल्लक पाणीसाठा महत्वपूर्ण ठरणार आहे.