ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनला गोव्याला जाताय ? जाणून घ्या

 कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनातर्फे विशेष ट्रेन 

Updated: Dec 8, 2019, 07:27 PM IST
ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनला गोव्याला जाताय ? जाणून घ्या title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : नाताळची सुट्टी आणि नववर्ष सेलिब्रेशनसाठी कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनातर्फे विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत. या विशेष ट्रेन एलटीटी-सावंतवाडी रोड, थिविम, करमाली आणि एर्नाकुलम दरम्यान चालविण्यात येणार आहेत. 01037 एलटीटी-सावंतवाडी ट्रेन 23,30 डिसेंबर आणि 6 जानेवारी रोजी रात्री 1.10 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 12.30 वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 01038 ट्रेन त्याच दिवशी दुपारी 2.20 वाजता निघुन एलटीटीला रात्री 12.20 वाजता येणार आहे. 

या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा दिलेला आहे. 01079 एलटीटी-कोच्चुवेल्ली ट्रेन 21,28 डिसेंबर आणि 4 जानेवारी रोजी रात्री 12.45 वाजता निघुन दुसऱ्या दिवशी सकाळी 9.05 वाजता कोच्चुवेल्लीला पोहोचणार आहे. परतीकरिता 01080 ट्रेन 22,20 डिसेंबर आणि 5 जानेवारी रोजी दुपारी 2.15 वाजता सुटणार असुन एलटीटीला दुसऱ्या दिवशी रात्री 11 55 मिनिटांनी पोहोचणार आहे. 

या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, मडगाव, कारवार, कुम्टा, मुरुडेश्वर,उडुपी आणि कोलाम स्थानकात थांबणार आहे. एलटीटी-करमाली ट्रेन 18, 25 डिसेंबर आणि 1,8 जानेवारी रोजी रात्री 12.45 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 12.30 वाजता आहे.

हमसफर एक्सप्रेस 

परतीच्या प्रवासासाठी 01006 ट्रेन 19,26 डिसेंबर आणि 2,9 जानेवारी रोजी दुपारी 1.50 वाजता निघुन एलटीटीला रात्री 12.20 वाजता येणार आहे. 01044  करमाली-पनवेल ट्रेन 18,25  डिसेंबर आणि 1,8 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता सुटणार असून त्याच दिवशी रात्री 10.45 वाजता पनवेलला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 01013 ट्रेन त्याच दिवशी रात्री 11.55 वाजता निघुन थिविमला दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता येणार आहे. याशिवाय 014467-01468 पुणे-एर्नाकुलम-पुणे हमसफर एक्सप्रेस चालविण्यात येणार आहे.