सराफा व्यापारी चिंतेत, वीस कॅरेट ला हॉलमार्क मान्यता देण्याची मागणी

वीस कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांच्या साठ्यामुळे सराफ व्यापारी सध्या चिंतेत आहेत.

Updated: Jan 21, 2020, 04:41 PM IST
सराफा व्यापारी चिंतेत, वीस कॅरेट ला हॉलमार्क मान्यता देण्याची मागणी title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : वीस कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांच्या साठ्यामुळे सराफ व्यापारी सध्या चिंतेत आहेत. कारण बीआयएस होलमार्कने 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे 20 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांची पुढील एक वर्षाच्या आत विक्री करावी लागणार आहे.

बीआयएस हॉलमार्कची 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याची मानके ठरविण्यात आली आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात 20 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा साठा शिल्लक असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. वीस कॅरेट ला हॉलमार्क मान्यता नसल्यामुळे येत्या वर्षभरात या दागिन्यांची विक्री न झाल्यास ती मोडीत काढावी लागणार आहेत. त्यामुळे जिल्हा सराफ असोशियन आता वीस कॅरेटच्या दागिन्यांना ही हॉलमार्क ची मान्यता मिळावी म्हणून मागणी केली आहे.

सांगली जिल्ह्यात सुमारे दोन हजाराच्या घरात सराफ व्यावसायिक आहेत. याठिकाणी उलाढालही मोठी आहे. पारंपारिक दागिने मध्ये 20 कॅरेट दागिन्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे अशा दागिन्यांचा मोठा साठा शिल्लक आहे होलमार्कची बंधन 15 जानेवारी 2020 पासून लागू झाले असून वीस कॅरेट चा दागिन्यांचा शिल्लक साठा संपवण्यासाठी शासनाने एक वर्षाची मुदत दिली आहे. म्हणजेच 15 जानेवारी 2019 पर्यंत हे दागिने विकता येतील.

हॉल मार्कला आमचा विरोध नाही मात्र 20 कॅरेट चे सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात आमच्याकडे शिल्लक आहेत आणि ती एक वर्षभरात विक्री होतील असं दिसत नाही. त्यामुळे वीस करेटच्या दागिन्यांच्या विक्रीसाठी आणखी मुदत मिळावी अशी आमची मागणी असल्याचे सांगली जिल्हा सराफ समिती सराफी व्यापारी आणि सचिव पंढरीनाथ माने यांनी सांगितले. 

मात्र सराफी व्यापाऱ्यांच्या कडे असलेल्या वीस कॅरेट सोन्याच्या साठ्याचा विचार करता, हे दागिने एक वर्षाच्या आत विक्री होतील अशी चिन्हे दिसत नाही. शिवाय तिचे दागिने वितळवून नवीन दागिने करायचे म्हटले तर, अगोदर केलेली कारागिरी आणि नंतरच्या दागिन्यासाठी सुद्धा होणारी कारागिरी याचा संपूर्ण खर्च सराफी व्यापाऱ्यांच्या अंगावर पडणार आहे. त्यामुळे 20 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीला आणखीन मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी साराफी व्यापारी करत आहेत.

तसेच होलमार्कची बारा केंद्र जिल्ह्यात आहेत. विशेषतः शहरी भागातच आहेत. तालुक्याच्या ठिकाणी होलमार्क केंद्र उभारलयास ग्रामीण सराफांना त्याचा लाभ होऊ शकतो. जिल्ह्यातील सोने-चांदीची उलाढाल मोठी असल्याने आणखी हॉलमार्क केंद्रे वाढवण्याची आवश्यकता आहे. सोन्याच्या साठ्यांचा विचार करता एक वर्षात सर्व दागिने विक्री होणार नसल्याने सराफ व्यापारी चिंतेत आहेत.