Today's Gold Silver Rate In Marathi : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही पुन्हा सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सध्या बाजारात सोन्याचे दर हे 69 हजारांच्या पुढे गेले आहेत. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव हा 75 हजार रुपये किलो आहे. सोन्याचे वाढते दर पाहता खरेदीदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 63,525 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तेच पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 63,525 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 69,300 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 63,525 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 69,300 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 63,525 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 69,300 रुपये आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे. हीच वाढ पाहता खरेदीदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याचा सर्वात मोठा फटका सोन्याच्या खरेदीदारांना बसला आहे. कारण सध्या लग्नसोहळ्याचा हंगामा सुरु आहे. या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोने-चांदी खरेदी करतात. मात्र सध्या सोन्या-चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. याचा सर्वाधिक फटका खरेदीदारांना बसत आहे. त्यामुळे अनेकजण सोने-चांदीच्या खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहे. सोनं आणि चांदीला असणारी मागणी आणि होणारा पुरवठा यावर दराचे गणित ठरवले जाते. सोन्याची मागणी वाढल्यास दरातही मोठी वाढ होत आहे.
2024 मध्ये जागतिक मंदी अपेक्षित आहे
लगनसराईमुळे सोन्याची मागणी वाढली आहे.
डॉलर निर्देशांक कमजोर झाला आहे
जगभरातील केंद्रीय बँका सोने खरेदी करत आहेत
बाजारातील जाणकारांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सोने 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. तसेच चांदीची किंमत 75 हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते.
सोन्याची मौल्यवान धातू गेल्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 1 मार्च रोजी सोन्याचा भाव 62,592 रुपये प्रति ग्रॅम होता, तर 31 मार्च रोजी सोन्याचा दर 67,252 रुपये प्रति ग्रॅम होता. म्हणजेच मार्चमध्ये त्याची किंमत 4,660 रुपयांनी वाढली. त्याच वेळी, चांदीचा भाव 69,977 रुपयांवरून 74,127 रुपये प्रति किलोवर पोहोचला.