धक्कादायक : कॉपीच्या संशयावरून विवस्त्र करून मुलींची झडती

कॉपी केल्याच्या संशयावरून मुलींची घृणास्पद पद्धतीनं झडती घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील लोणी काळभोरमध्ये घडलाय.

Updated: Mar 3, 2018, 03:10 PM IST
धक्कादायक : कॉपीच्या संशयावरून विवस्त्र करून मुलींची झडती title=

पुणे : कॉपी केल्याच्या संशयावरून मुलींची घृणास्पद पद्धतीनं झडती घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील लोणी काळभोरमध्ये घडलाय.

सध्या १० वी, १२ वीच्या परीक्षा सुरु आहेत. लोणी काळभोरमधील एमआयटी शाळेत या परीक्षेचं केंद्र आहे. या ठिकाणी परीक्षार्थी मुलींची अतिशय वाईट पद्धतीनं झडती घेण्यात येत होती.

मुलींना विवस्त्र करुन त्यांची तपासणी केली जात होती. सलग ३ ते ४ दिवस हा प्रकार सुरु असल्यानं मुलींनी अखेर पालकांकडे तक्रार केली.

त्यावर संतापलेल्या पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. दरम्यान विभागीय शिक्षण मंडळाचं पथक शाळेत पोचणार असल्याची माहिती मिळतीय.

तर या विद्यार्थिनींच्या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचा दावा शाळा प्रशासनाकडून करण्यात आलाय.