ती दारुच्या नशेत आली, मला शिवीगाळ केली अन्...; तरुणीच्या अंगावर गाडी घालणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलाने मांडली बाजू

Thane News Today: ठाण्यात प्रियकरानेच आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यात 11 डिसेंबरला  हा प्रकार घडला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 16, 2023, 04:03 PM IST
ती दारुच्या नशेत आली, मला शिवीगाळ केली अन्...; तरुणीच्या अंगावर गाडी घालणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलाने मांडली बाजू title=
girlfriend instagram influencer priya singh senior bureaucrat son crushed with car

Thane News Today: ठाण्यात प्रियकरानेच आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेत तरुणीचे नाव प्रिया सिंह असून तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रियकर अश्वजित गायकवाडविरोधात आरोप केले होते. मात्र, आता पोलिसांना दिलेल्या जबाबात अश्वजीत गायकवाड याने प्रियाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच, प्रिया फक्त माझी मैत्रिण असल्याचे त्याने म्हटलं आहे. 

अश्वजित गायकवाड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा आहे. प्रिया सिंग याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन काही फोटो पोस्ट करत एक पोस्ट लिहित आरोप केले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच अश्वजीत गायकवाड याने पोलिसांकडे जबाब देताना आरोप फेटाळले आहेत. प्रिया माझी प्रेयसी नसून मैत्रिण होती. तसंच, ती स्वतः मला भेटायला हॉटेलमध्ये येऊन माझ्यावर बोलण्याचा दबाव टाकत होती. मी जेव्हा नकार दिला तेव्हा तिने नशेत गोंधळ घातला, असं अश्वजीतने सांगितले आहे. 

आज तकने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अश्वजीत गायकवाड यांने पोलिसांना सुरुवातीला दिलेल्या जबाबात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अश्वजीत याच्या म्हणण्यानुसार, प्रिया सिंहने खोटे आरोप केले आहेत. आम्ही दोघ फक्त मित्र आहेत. प्रिया त्या दिवशी नशेत असताना हॉटेलमध्ये आली होती. तिथे मी एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलो होते. तिथे पोहोचल्यावर प्रिया माझ्यावर बोलण्यासाठी दबाव टाकत होती. जेव्हा मी तिला नकार दिला तेव्हा तिने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 

अश्वजीतने पोलिसांना पुढे सांगितले की, यादरम्यान माझ्या मित्रांनी मध्ये पडून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रियाने त्यांनाही मारहाण केली. त्याचवेळी ड्रायव्हर शेळके यांनी एसयुव्ही सुरू केली तरीहीदेखील प्रिया तिथून बाजूला व्हायला तयार नव्हती. चुकून तिला धक्का कारचा धक्का लागला. जाणुनबुजून ही घटना घडलेली नाहीये. अश्वजीत याने पुढे आरोप केला आहे की, पैसे उकळण्यासाठीचा हा प्रयत्न केला आहे. या आधीही तिने माझ्याकडून कित्येकवेळा पैसे घेतले होते. ज्याचे माझ्याकडे रेकॉर्डदेखील आहेत.

दरम्यान, प्रिया सिंह ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. प्रियाने केलेल्या आरोपांनुसार, अश्वजीतचे लग्न झाले आहे. मात्र ही गोष्ट त्याने माझ्यापासून लपवले होते. तुझ्याशीच लग्न करेन असं अश्वासन त्याने दिले होते.