धक्कादायक! हुंड्याचा खर्च वाचवण्यासाठी तरूणीची आत्महत्या

लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी शेतक-याच्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. 

Updated: Nov 14, 2017, 02:53 PM IST
धक्कादायक! हुंड्याचा खर्च वाचवण्यासाठी तरूणीची आत्महत्या title=

औरंगाबाद : एकीकडे शेतक-यांच्या आत्महत्या थांबवण्याचं नाव घेत नसताना आता शेतक-यांच्या मुलांच्या आत्महत्याही समोर येत आहेत. लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी शेतक-याच्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. 

वर्षा कैलास राठोड असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव असून ती मूळची जालना जिल्ह्यातील अंबडची रहिवासी होती. ती औरंगाबादमध्ये बी.कॉमच्या तिस-या वर्षाला शिकत होती. मात्र तृतीय वर्षात नापास झाल्यामुळं ती निराश झाल्याचंही आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलंय. 

आई-वडलांनी शिक्षणासाठी सोनं गहाण टाकून खर्च केला. आता लग्नासाठीही हुंड्याचा खर्च करावा लागेल. ते आपल्याला नको असल्याचं गळफास लावून आत्महत्या करत असल्याचं वर्षानं चिठ्ठीत लिहिलंय. मराठवाड्यात शेतक-यांची अवस्था गंभीर असल्याचं यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आलंय.