वडिलांचे निधन झाल्यानंतर पुजाने दिला दहावीचा पेपर

घरातील कमावत्या वडिलाचे निधन झाल्यानंतर धैर्यकन्या पुजाने दहावीचा पेपर दिला. दुःख बाजूला सारून हृदयावर दगड ठेऊन मराठीचा पेपर दिला.

Updated: Mar 3, 2018, 12:09 AM IST
वडिलांचे निधन झाल्यानंतर पुजाने दिला दहावीचा पेपर  title=

हिंगोली : घरातील कमावत्या वडिलाचे निधन झाल्यानंतर धैर्यकन्या पुजाने दहावीचा पेपर दिला. पूजाच्या वडिलांना पूजा खूप शिकावे अशी इच्छा होती पण वडील चंपती हनवते यांचा एकाएकी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्त्यू झाला वडिलांची इच्छा पूर्ण करायची म्हणून पुजाने दुःख बाजूला सारून हृदयावर दगड ठेऊन मराठीचा पेपर दिला.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील येणाऱ्या भोसी येथिल चंपती हनवते यांच बुधवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे हनवते कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. चंपती यांची आपल्या मुलांना शिकवून मोठं करण्याची खूप इच्छा होती. पण चंपती हनवते यांचा लाडक्या लेकीच्या दहावीच्या पहिल्या पेपरपूर्वीच निधन झालं. 

वडिलांनी दिलेल्या शिकवणीमुळे घरात मृतदेह असतांना दहावीचा पहिला पेपर पुजाने देण्याचा निश्चय केला. भोसी येथून १२  किमी दूर असलेल्या डिग्रस कह्राळे येथील परीक्षा केंद्रावर जाऊन तिने ११  ते २ असा पेपर सोडवला. त्यानंतर वडिलांच्या अंतविधीला उपस्थित झाली. चंपती हनवते यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा पत्नी असा परिवार आहे. धेर्यकन्या पुजाने दाखवलेल्या हिंमतीबद्दल तीच सर्वत्र कौतुक होत आहे.