आई आजारी असल्याचे सांगून आठवीतील मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न

नेवासा शहरातील माध्यमिक शाळेतील आठवीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या सतर्कतेने फसलाय. याप्रकरणी एकूण सहा मुलांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. 

Updated: Mar 2, 2018, 11:34 PM IST
आई आजारी असल्याचे सांगून आठवीतील मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न title=

अहमदनगर : नेवासा शहरातील माध्यमिक शाळेतील आठवीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या सतर्कतेने फसलाय. याप्रकरणी एकूण सहा मुलांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. 

आठवीतील एका मुलीची आई आजारी असल्याचा बनाव रचत काही मुलं शाळेत आली. तिला घेण्यासाठी आल्याचं त्यांनी शिक्षकांना सांगितलं. शिक्षकाने नाव विचारल्यानंतर मुलाने गणेश शिंदे असं नाव सांगून मी तिचा भाऊ असल्याचं सांगितलं. मात्र अडनाव का एकच नाही यावरून शिक्षकांना संशय आला आणि त्यांनी त्याला शाळेतच थांबवले.

गणेश याला शाळेत थांबून ठेवले हे लक्षात येताच इतर मुलांनी तेथून पळ काढला. शाळेतील शिक्षकांनी या मुलीस बोलावले असता त्या मुलीने गणेश याला ओळखत नसल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला त्यानंतर आम्ही या मुलीचे अपहरण करणार होतो असं त्याने कबुल केलं. 

या माहितीनंतर पोलिसांनी पळून गेलेली मुले नेवासे शहरच्या परिसरात पकडली. या मुलांना नेवासा न्यायालयात हजर करण्यात आले होते. या आरोपींना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे.