पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट सैल जिभेबाबत कायम चर्चेत असतात. नुकताच पुण्यात एका उड्डाणपुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमात एक कार्यकर्ता फोनवर बोलत होता, त्याला बापट यांनी घे बायकोशी बोलून असा सल्ला दिला. जेव्हा तो अविवाहित आहे हे उपस्थितांनी सांगितलं, तेव्हा बापट यांची जीभ घसरली.
भाजपमध्ये ये नोकरी देतो, लग्न कर, पण एकदाच कर, असा फुकटचा सल्लाही त्यांनी दिला. या आधीही बापट यांनी जाहीर कार्यक्रमात मुक्ताफळे उधळली आहेत.