Pune News: 9000 लिटर गावठी दारू जप्त, ड्रग्सनंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर

Pune News: पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायावर मोठी छापेमारी केली आहे. यावेळी पुणे शहराजवळ पोलिसांनी मोठा दारूसाठा जप्त केला आहे. ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर आहे. उरुळी कांचन पोलीसांची मोठी कारवाई केली आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 27, 2024, 08:12 AM IST
Pune News: 9000 लिटर गावठी दारू जप्त, ड्रग्सनंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर title=

Pune News: पुणे ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा शहराजवळ एक मोठी कामगिरी केली आहे. यावेळी दारूची अवैध व्यवसायावर करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर असल्याचं दिसून येतंय. यावेळी पुणे शहराजवळ तब्बल ९००० लिटर दारू जप्त केली आहे. 

पुणे पोलिसांनी धडक करवाई

पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायावर मोठी छापेमारी केली आहे. यावेळी पुणे शहराजवळ पोलिसांनी मोठा दारूसाठा जप्त केला आहे. ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर आहे. उरुळी कांचन पोलीसांची मोठी कारवाई केली आहे. पुणे शहराजवळ सोरतापवाडी जवळ पोलीसांनी हातभट्टीवर मोठा छापा टाकून जवळपास नऊ हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. 

सोरतापवाडी भागात पोलिसांनी 2 ठिकाणी कारवाई केली आहे. यावेळी एका कारवाईत पोलिसांनी 525 लिटर दारू जप्त केली आहे. तर दुसऱ्या कारवाईत 9000 लिटर हातभट्टी दारूचं कंटेनर जप्त केले आहेत. पोलिसांनी याच ठिकाणी छापेमारी करत दारू तयार करण्यासाठी लागणारे 5000 लिटर रसायन जप्त केले आहेत. 

काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक तसंच विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने काही छापे टाकले. यावेळी जिल्ह्यात सहा गावात छापे टाकण्यात आले असून 995 लीटर गावठी हातभट्टी दारूसह 7 लाख 90 हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. 

दुसरीकडे 13 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी रोजी या भरारी पथकाने सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळींब, राजेवाडी आणि आंबळे या ठिकाणी छापे टाकले. यावेळी या कारवाईमध्ये या कारवाईत 5 वारस आणि 3 बेवारस अशा 8 गुन्ह्यांची नोंद करून 995 लिटर गावठी हातभट्टी दारू, 25 हजार लिटर रसायण, 3 दुचाकी वाहने आणि गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.