ती अंघोळ करत असताना अचानक गॅस झाला लीक, बाथरूममधील यमदूताने घेतला तरुणीचा जीव

Gas Geyser Incident in Nashik : बहिणीच्या मृत्यूने भाऊ हळहळला. गॅस गिझर वापरताना काळजी घेण्याचं केलं आवाहन, अचानक घडलेल्या घटनेने परिसर हादरला 

Updated: Feb 2, 2022, 08:33 AM IST
ती अंघोळ करत असताना अचानक गॅस झाला लीक, बाथरूममधील यमदूताने घेतला तरुणीचा जीव title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  नाशिक रोड परिसरात गॅस गिझर लिकेज झाल्यामुळे एका तरुणीचा मृत्यू झाला. साक्षी जाधव असं 21 वर्षांच्या मृत तरूणीचं नाव आहे. ही घटना उपनगरमधील संकुल नगर परिसरात शनिवारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. 

दुपारी ती आंघोळ करत असताना गॅस गिझर लिक झाला. आणि संपूर्ण बाथरूममध्ये गॅस पसरला. तिला ते लक्षात आलं नाही. अखेर बेशुद्ध होऊन ती बाथरूममध्ये पडली. 

अर्धा तास होऊनही ती बाहेर आली नाही म्हणून घरच्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा घडला प्रकार उघड झाला.

बहिण गमावल्यावर भावाची कळकळीची विनंती 

एकुलती एक बहिण गमाविल्याने  प्रत्येक  नागरिकाने आपल्या घरातील सदस्यांना  वाचविण्यासाठी  गॅस गिझरचा वापर करणे टाळावे असे कळकळीचे आवाहन तिच्या प्रतिक जाधव  भावाने केले आहे .
 
साक्षी जाधव वय 21 वर्ष , एम ए चे शिक्षण घेत असलेली ही तरुणी आपल्या आईसोबत  श्रीसंकुल या अपार्टमेंटमध्ये राहत होती. नाशिकरोड परिसरात पाणी न आल्याने दुपारच्या वेळेस आंघोळीसाठी ही तरुणी या बाथरुममध्ये गेली. आंघोळ करत असताना गॅस गिझर लिकेज झाला मात्र थंडी खूप असल्याने निर्माण झालेले बाष्प बाथरूममध्ये तयार झाला. 

या वाफेसोबत हळू हळू संपूर्ण गॅस बाथरूम  मध्ये पसरला आणि तिच्या नाकातोंडात शिरू लागला.  मात्र हा उग्र वास वाफेच्या संमिश्र झाल्याने ती आंघोळ करत राहिली. मात्र नाकातोंडाद्वारे हा गॅस जाऊन अखेर ती ओक्सिजनच्या  अभावामुळे  बाथरूम मध्ये बेशुद्ध झाली...

अर्धा तास होऊनही ती बाहेर येत नाही हे बघून घरच्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला.  तेव्हा ती  बेशुद्ध अवस्थेत निर्वस्त्र आढळून आली. तिला उचलून दिवाणखान्यात आणले. त्यावेळी तिला उलटी झाली. यानंतर साक्षीला  तातडीने  जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याने  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जाधव कुटुंबासह सर्व परिसर या घटनेने हळहळलाये. जेल रोड आणि नाशिक रोड परिसरात या घटनेची चर्चा आहे. तिच्या भावाने केवळ काही पैसे वाचविण्यसाठी  गॅस गिझरचा वापर करू नका अशी कळकळीची विनंती केली आहे.

सध्या विजेच्या वाढत्या दरांमुळे प्रत्येक जण गॅस गिझरचा वापर करतोय.  थंडीच्या  दिवसांमध्ये गॅस गिझरचा वापर मुबलक प्रमाणात होतो मात्र त्याच्या सर्विसिंगकडे दुर्लक्ष होते त्यामुळे सर्वांनी आपल्या घरातला गॅस गिझर वापरताना काळजी घेण्याची गरज आहे.