औरंगाबाद : औरंगाबादच्या ऐतिहासिक टाऊन हॉल परीसरात कचरा टाकल्याची बातमी झी मीडियानं शनिवारीच उघड केली होती. झी 24 तासच्या या वृत्ताची दखल घेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी 21 एप्रिलला संध्याकाळपर्यंत कचरा साफ कऱण्याचं आश्वासन दिलं. मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही टाऊन हॉल साफ झालेला नाही. त्यामुळं आज दिवसभरात तरी टाऊन हॉल कचरा मुक्त होईल का हाच महत्वाचा प्रश्न आहे.
औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यात त्यांनी सगळ्यांचीच खरडपट्टी काढली. येत्या दहा दिवसांत कचरा प्रश्न सोडवा आणि तात्काळ रस्त्यावरील कचऱ्याची विल्हेवाट लावा, असे आदेश त्यांनी महापौर आणि पदाधिकाऱ्यांना दिले होते. या बैठकीत मीडियालाही परवानगी नव्हती. आम्हाला १० दिवसांची मुदत दिली, मात्र खरडपट्टी काढली नसल्याचा दावा महापौरांनी केला होता.
माफी मागून हा प्रश्न सुटणारा नाहीये, ऐतिहासिक वास्तूत कचरा लपवणे म्हणजे या वास्तूंचा तो अपमान आहे, तसाही कचरा प्रश्नाने शहराचा कचरा झालाच आहे त्यात आता ऐतिहासिक वास्तूंची विटंबना करून ऐतिहासिक शहराचे नाव आणखीनंच खराब झालय, कारवाई होईलही मात्र खऱच असा कचरा लपवून कचरा प्रश्न सुटेल का हाच खरा प्रश्न आहे.