गंगापूर धरणाला खेकड्यांचा धोका आहे का ? शासनाचा पाटबंधारे विभागाला प्रश्न

 मातीचे धरण असलेल्या गंगापूर धरणाला खेकड्यांचा धोका आहे का ? 

Updated: Jul 12, 2019, 11:27 AM IST
गंगापूर धरणाला खेकड्यांचा धोका आहे का ? शासनाचा पाटबंधारे विभागाला प्रश्न title=

नाशिक : चिपळूणमधील तिवरे धरण हे निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे नव्हे तर खेकड्यांमुळे फुटले, असा अजब दावा राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. त्यानंतर राज्यभरातून खेकड्याची 'धास्ती' घेतली गेली. यावर अनेक मेम्स व्हायरल झाले. विरोधकांनी 'आरोपी खेकड्यांना' पोलिसांच्या हवाली केले. मातीचे धरण असलेल्या गंगापूर धरणाला खेकड्यांचा धोका आहे का ? असा प्रश्न पाटबंधारे विभागाला शासनाने विचारला आहे. 

तिवरे धरण फुटून 20 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरे उद्धवस्त झाली. गावकऱ्यांची शेती, मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. या धक्क्यातून अद्याप जिल्हा अद्याप सावरलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक धरण्यांच्या गळती समोर येत आहेत. धरणा शेजारी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय. गंगापूर धरणा संदर्भातही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 
मातीचे धरण असलेल्या गंगापूर धरणाला खेकड्यांचा धोका ? असा प्रश्न शासनाकडून पाटबंधारे विभागाला करण्यात आला.  खेकडा दगड कोरु शकतो तर माती का नाही ? यासाठी आता सर्व्हेक्षण केले जात आहे. तिवरे धरणही मातीचे होते. या धरणफुटीच्या पार्शवभूमीवर शासनातर्फे राज्यभरात धरणाचा आढावा घेतला जात आहे.