Ganesh Visarjan 2022: बाहेर पडण्याचा प्लान करत असाल तर.., 'अशी' असेल वाहतूक व्यवस्था

तब्बल दोन वर्षांनंतर बाप्पांसाठी जंगी मिरवणुका निघणार असल्याने वाजत गाजत गुलाल उधळत निरोप देण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकर (Mumbaikar) तसेच मुंबई महापालिका (BMC), पोलिस, वाहतूक (Trffic Police) शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. शहर आणि उपनगरात विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात (Mumbai Police) मोठी वाढ करण्यात आली आहे. 

Updated: Sep 9, 2022, 08:25 AM IST
Ganesh Visarjan 2022: बाहेर पडण्याचा प्लान करत असाल तर.., 'अशी' असेल वाहतूक व्यवस्था  title=

Ganesh Visarjan 2022 :  दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा (Ganpati Bappa 2022) आज, शुक्रवारी आपल्या गावी जाण्यास निघणार आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर बाप्पांसाठी जंगी मिरवणुका निघणार असल्याने वाजत गाजत गुलाल उधळत निरोप देण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकर (Mumbaikar) तसेच मुंबई महापालिका (BMC), पोलिस, वाहतूक (Trffic Police) शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

शहर आणि उपनगरात विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात (Mumbai Police) मोठी वाढ करण्यात आली आहे.  (ganeshotsav 2022 ganesh visarjan traffic route change)

तर दुसरीकडे गणेशोत्सवाची (ganeshotsav 2022) विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून पोलिसांकडून शुक्रवारी (ता. ९) व शनिवारी मिरवणूक संपेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते (road) वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी विसर्जन मिरवणुकीमुळे पर्यायी मार्ग असलेल्या ‘रिंग रोड’ (Ring Road)चा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास यंदाच्या विसर्जन मिरवणूक सुरुवात होईल. विसर्जन (Ganpati Visarjan) मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्‍यता असते. पोलिसांनी ही गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन केले आहे. नागरिकांची सुरक्षितता व सोईच्यादृष्टीने मध्यवर्ती भागातील मिरवणूक मार्गावरील बहुतांश रस्ते शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

पुण्यातील वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते...

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता : काकासाहेब गाडगीळ जंक्‍शन ते जेधे चौक.

लक्ष्मी रस्ता : संत कबीर चौकी ते टिळक चौक

बाजीराव रस्ता : बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक

कुमठेकर रस्ता : टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक

टिळक रस्ता : जेधे चौक ते टिळक चौक

गणेश रस्ता : दारूवाला पूल ते जिजामाता चौक

केळकर रस्ता : बुधवार चौक ते टिळक चौक

लाल बहादूर शास्त्री रस्ता : सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक

जंगली महाराज रस्ता : झाशी राणी चौक ते खंडुजी बाबा चौक

गुरू नानक रस्ता : देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौक

दुपारनंतर बंद होणारे रस्ते...

प्रभात रस्ता : डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक

कर्वे रस्ता : नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक

फग्युर्सन महाविद्यालय रस्ता : खंडुजीबाबा चौक ते फग्युर्सन महाविद्यालय प्रवेशद्वार

भांडारकर रस्ता : पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक, नटराज चौक

पुणे सातारा रस्ता : व्होल्गा चौक ते जेधे चौक

सोलापूर रस्ता : सेव्हन लव्हज्‌ चौक ते जेधे चौक

याठिकाणी वाहने पार्किंग करू नका...

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून मुख्य मिरवणूक संपेपर्यंत लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, फग्युर्सन रस्ता, खंडुजी बाबा चौक ते वैशाली हॉटेलदरम्यान जोडणाऱ्या उपरस्ता परिसरातील १०० मीटर परिसरात पार्किंगसाठी बंदी राहील.

येथे वाहने पार्किंग...

एच. व्ही. देसाई कॉलेज, पुलाची वाडी नदी किनारी, पूरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याच्या बाजूला, दारूवाला पूल ते खडीचे मैदान, गाडगीळ पुतळा ते कुंभार वेस, काँग्रेस भवन मनपा रस्ता, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल दरम्यान नदीपात्रातील रस्ता, हमालवाडा पार्किंग नारायण पेठ.

वाहतूक वळवली जाणारी ठिकाणे

जंगली महाराज रस्ता : झाशी राणी चौक

शिवाजी रस्ता : स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा

मुदलियार रस्ता : अपोलो चित्रपटगृह

नेहरू रस्ता : संत कबीर पोलिस चौकी

सोलापूर रस्ता : सेव्हन लव्हज चौक

सातारा रस्ता : व्होल्गा चौक

बाजीराव रस्ता : पूरम चौक

लाल बहादूर शास्त्री रस्ता : सेनादत्त पोलिस चौक

कर्वे रस्ता : नळस्टॉप

फग्युर्सन महाविद्यालय रस्ता : गुडलक चौक