Ganesh Chaturthi 2023 : आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर 'ही' चिमकुली विचारतेय 'बाप्पा मोदक कसा खातो?'

Ganesh Chaturthi 2023 Video : सर्वत्र वातावरण बाप्पामय झालं आहे. अशात एका चिमुकलीचा व्हिडीओ यूजर्सचं मनं जिंकतोय. बाप्पा मोदक कसा खातो, तिचे हावभाव पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडला. 

Updated: Sep 19, 2023, 04:40 PM IST
Ganesh Chaturthi 2023 : आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर 'ही' चिमकुली विचारतेय 'बाप्पा मोदक कसा खातो?' title=
ganesh chaturthi 2023 Amchya papani ganpati anla little Girl modak bappa prasad ganpati video viral instagram trending today

Ganesh Chaturthi 2023 Video : सर्वत्र वातावरण गणेशमय झालं आहे. आपल्या लाडक्या बाप्पा आपल्यासोबत राहिला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर रीलस्टार साईराजचा आमच्या पप्पांनी गणपती आणलाय हे गाणं ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यानंतर अजून एका चिमुकल्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकतोय. गणपती बाप्पा आणि लहान मुलांचं नातं अतिशय निरागस असतं. (ganesh chaturthi 2023 Amchya papani ganpati anla little Girl modak bappa prasad ganpati video viral instagram trending today )

चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत बाप्पासाठी वेड आहेत. अशातच सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर ही चिमुकली कुटुंबासोबत लाडक्या बाप्पाला घ्यायला पोहोचली. तिच्या निरागसपणा आणि बोबडे बोलीतील प्रश्न ऐकून आपण भारावून जातो. 

हेसुद्धा वाचा - 'आमच्या पप्पांनी गणपती आणला…' रातोरात रीलस्टार झालेला चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?

ही चिमुकली बाप्पाच्या आगमनाने उत्साही दिसत आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत तुडूतुडू ती नाचत आहे. तिचे वडील विचारतात की, तुला आवडतात ना मोदक, मग खाणार मोदक...त्यावर हो गोंडस मुलगी इतक्या छान प्रकारे हावभाव करत सांगते की आपण तिच्या प्रेमातच पडतो. त्यावर ही चिमुकली हातवारे करत विचारते बाप्पा मोदक कसा खातो असा खातो का?

हेसुद्धा वाचा - Ganesh Chaturthi 2023 : बाप्पासोबतचं निरागस नातं! चिमुकल्याचा हा Video जिंकतोय नेटकऱ्यांचं मन

तुम्ही पाहिलं का ती कसं कृत्य करून विचारते...तुम्हीही काय उत्तर द्याल या चिमुकलीच्या प्रश्नाचं...हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं मनं जिंकतोय.