औरंगाबादेत १६ ठिकाणी जुगार सुरुच, पोलिसांचे दुर्लक्ष

औरंगाबादमध्ये तीन ठिकाणी जुगार कसा सुरू आहे याचा व्हीडिओ झी मीडियाला मिळालाय. 

Updated: Dec 20, 2017, 01:41 PM IST
औरंगाबादेत  १६ ठिकाणी जुगार सुरुच, पोलिसांचे दुर्लक्ष title=

औरंगाबाद : शहरातील तीन ठिकाणी जुगार कसा सुरू आहे याचा व्हीडिओ झी मीडियाला मिळालाय. औरंगाबाद शहरात १६ ठिकाणी जुगार सऱ्हास सुरु आहे. 

जुगार अड्ड्यांवर विद्यार्थी

अगदी मोक्याच्या ठिकाणी हा जुगार अड्डा सुरु आहे. धक्कादायक म्हणजे हा जुगार खेळताना सर्वच ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येनं दिसून येतायत. या जुगाराच्या माध्यमातून दररोज कोट्यवधींची उलाढाल सुरु असल्याचं कळतंय.

कारवाईकडे दुर्लक्ष

पोलिसांना याची कल्पना आहे की, त्यांच्या आशीर्वादानं हा प्रकार सुरु आहे हाच खरा प्रश्न आहे. पोलीस आता तरी कारवाई करतील का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.