गडचिरोली :बदली झालेल्या शिक्षकाला निरोप देताना आदिवासी गावकरी भावूक

झपाटलेपण जपत ग्रामपरिवर्तन करणाऱ्या आपल्या शिक्षकाचा आसा काही सत्कार केला की भले भले थक्क झाले. आपल्या लाडक्या शिक्षकाला निरोप देताना ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू आले.

Updated: May 30, 2018, 10:59 AM IST

गडचिरोली: आदिवासी आणि मागास असे बिरुद असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एका गावाने शिक्षणाप्रती आपली असलेली आस्था आगळ्या पद्धतीने सिद्ध केली.  झपाटलेपण जपत ग्रामपरिवर्तन करणाऱ्या आपल्या शिक्षकाचा आसा काही सत्कार केला की भले भले थक्क झाले. आपल्या लाडक्या शिक्षकाला निरोप देताना ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू आले.

शिक्षकाच्या बदलीने गावकऱ्यांन आतीव दु:ख

साधारण, १० वर्षांपूर्वी  गरंजी गावातील जिल्हा परिषद शाळेत आंतरजिल्हा बदलीच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील विजय कारखेले हे तरूण शिक्षक रुजू झाले. काही करण्याची जिद्द यामुळे त्यांनी गावात वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा प्रारंभ केला. स्वच्छ गाव, पर्यावरण रक्षण, व्यसनमुक्ती , शासकीय योजनांची माहिती आणि रस्ते निर्मितीदेखील केली. त्याचबरोबर गावाला तंबाखुमुक्तीची वाट दाखविली. त्यामुळे गाव त्यांच्या बदलीने भावूक झाले. मात्र अश्रू पुसत त्यांनी विजय कारखेले याना असा निरोप दिला.